Next

धक्कादायक ! १२ वर्षाच्या मुलीवर काकानेच केला बलात्कार | Rape Case Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 10:51 AM2020-10-05T10:51:28+5:302020-10-05T10:52:18+5:30

घरात आजोबाचा मृत्यू झालेला.... रिजीरिवाजानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी आलेल्या पाहुण्यांना जेवणाची पंगत वाढत असताना काकाने बारा वर्षीय पुतणी बाहेर गेल्याची संधी साधली...तिला ओढत घराशेजारी असलेल्या बांबुच्या रांजीत नेले व तिथेच तिच्यावर बलात्कार केला. गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला गावात काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हा संतापदायक प्रकार समोर आला. गोंडपिंपरी तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर येनबोथला येथे पीडित मुलीच्या आजोबाचे काल निधन झाले. दुपारी अंत्यविधी पार पडल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास घरातील मंडळी पाहुण्यांसह जेवण करायला बसले. पाहुण्यांना जेवण देत असताना सदर मुलगी घरातून बाहेर पडली. यावेळी कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधत आरोपी काका कमलाकर राऊत याने तिला घराजवळच असलेल्या रांजीत नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. काही वेळातच मुलीचे वडील हे घराबाहेर निघाले असताना मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने मुलीचे वडील गेले असता घटनास्थळावरून आरोपी कमलाकर राऊत याने पळ काढला. मुलीला विचारपूस केली असता काकाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तिने दिली. एवढंच नाही तर यापूर्वी देखील कमलाकर राऊत याने माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता व ही माहिती कुणाला सांगितली तर तुला जीवे मारीन, अशी धमकी सुद्धा दिली होती. त्यामुळे भीतीपोटी मुलीने घरच्यांना ही बाब सांगितली नाही.

टॅग्स :महाराष्ट्रबलात्कारमराठीपुणेगुन्हेगारीMaharashtraRapemarathiPuneCrime News