Next

बीडमध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस चालक, वाहकाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 03:11 PM2019-05-18T15:11:53+5:302019-05-18T15:14:14+5:30

माजलगाव (बीड) : सर्व प्रवासी बसमध्ये बसल्याने स्वतःची गाडी रिकामी राहिल्याने एका अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्याने रागाच्या भरात बस ...

माजलगाव (बीड) : सर्व प्रवासी बसमध्ये बसल्याने स्वतःची गाडी रिकामी राहिल्याने एका अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्याने रागाच्या भरात बस अडवून चालक आणि वाहकास मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. १८ )  सकाळी घडली. यानंतर मारहाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी करत चालक वाहकांनी शिवाजी चौकात बस आडव्या लावत रास्तारोको आंदोलन केले.