शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.पोटनिवडणूक : कोरोनास्थितीचा अहवाल पाठविला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST

संतोष वानखडे वाशिम : स्थगित असलेली जिल्हा परिषद व पंचायत समितीची पोटनिवडणूक आणखी लांबणीवर टाकायची की कोरोना नियंत्रणात असल्याने ...

संतोष वानखडे

वाशिम : स्थगित असलेली जिल्हा परिषद व पंचायत समितीची पोटनिवडणूक आणखी लांबणीवर टाकायची की कोरोना नियंत्रणात असल्याने स्थगिती उठवायची? याबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा अहवाल मागविला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा अहवाल पाठविला असून, जि.प. गट व गणात केवळ दोन रुग्ण सक्रिय असल्याने स्थगिती उठणार की पोटनिवडणूक आणखी लांबणीवर पडणार? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

वाशिम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांच्या सदस्यांची सदस्यत्व रद्द झाले असून, या रिक्त पदांसाठी १९ जुलै रोजी पोटनिवडणूक होणार होती. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या ९ जुलैच्या आदेशानुसार पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमास स्थगिती देण्यात आली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने, राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांतील कोरोना प्रादुर्भावाची सद्य:स्थिती काय आहे, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या किती आहे, आदी परिस्थितीचा अहवाल मागविला होता. त्यानुसार कोरोनास्थितीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला.

००००००००००००००००

दोन रुग्ण सक्रिय

जिल्ह्यात १४ जि.प. गट आणि २८ पं.स. गणात पोटनिवडणूक होणार आहे. या गट व गणात किती कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, याचा अहवाल मागविण्यात आला होता. गोभणी जिल्हा परिषद गटात एक आणि पोहा पंचायत समिती गणात एक असे दोन रुग्ण सक्रिय आहेत. उर्वरित १३ जि.प. गट आणि २७ पं.स. गणात कोरोना रुग्ण नाहीत.

००००००००००००००००००

पोटनिवडणूक होण्याची शक्यता?

जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात असल्याचे ॲक्टिव्ह रुग्णसंख्येवरून दिसून येते. केवळ दोन ठिकाणी कोरोना सक्रिय रुग्ण असल्याने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात रंगत आहे. पोटनिवडणूक होणार की आणखी लांबणीवर पडणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.