शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाच्या कामाने घेतला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST

वाशिम : शहरातील वाशिम-पुसद मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे नांदेड रेल्वे विभागाचे काम रेंगाळत सुरू होते. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ...

वाशिम : शहरातील वाशिम-पुसद मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे नांदेड रेल्वे विभागाचे काम रेंगाळत सुरू होते. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद होते. लोकमतने या संदर्भात ६ सप्टेंबर रोजी ‘उड्डाणपुलाचे काम रेंगाळले’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच उड्डाणपुलाच्या कामाला यंत्रणेकडून वेग देण्यात आला आहे.

वाशिम शहरामधून जाणाऱ्या पुसद मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग गेट क्र. ११४ मुळे सतत वाहतूक कोंडी होते. जिल्हाभरातील जनतेची ही समस्या सोडविण्यासाठी खासदार भावना गवळी यांनी विशेष पुढाकार घेत केंद्र शासनाकडे सतत पाठपुरावा केला. यामुळे केंद्रीय रस्ते विकास निधीअंतर्गत पुसद रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक ११४ व हिंगोली रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक ११५ वरील उड्डाणपूल मंजूर झाले. त्यानंतर पुसद रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाच्या कामास सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिमकडून पाच वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली; परंतु या कामाला अपेक्षित गती मिळाली नाही. गेल्या दीड महिन्यांपूर्वी रेल्वेने त्यांच्या अखत्यारीतील कामाला गती दिली आणि रेल्वे लाइनवरील पुलाच्या छताचे काम वेगात सुरू केले; परंतु आता हे काम पुन्हा रेंगाळले होते. यामुळे येथील वाहतूक कोंडीची सुटण्याची प्रतीक्षा लांबली होती. लोकमतने या संदर्भात ६ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित करताच उड्डाणपुलाच्या कामाने वेग घेतला आहे.

०००००००००००००००००००००००००००००

लाइनवरील गर्डरचे काम अंतिम टप्प्यात

वाशिम-पुसद मार्गातील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी रेल्वेकडून त्यांच्या अखत्यारीतील स्लॅबचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. गेल्या चार वर्षांत बांधकाम विभागाकडूनही अत्यंत संथगतीने काम केले जात होते. आता मात्र रेल्वेने प्रत्यक्ष रेल्वेलाइनवरील गर्डरच्या कामाला वेग दिला असून, हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

०००००००००००००००००००००

बांधकाम विभागानेही घेतली तसदी

वाशिम-पुसद मार्गावर रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे काम रेल्वेकडून रेंगाळले असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामही ठप्प झाले होते. आता मात्र रेल्वेने कामाला गती दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागही कामासाठी सरसावला असून, रेल्वेलाइन लगत त्यांच्या अखत्यारीतील प्रारंभिक कामाला त्यांनीही सुरुवात केली आहे.

०००००००००००००००००००००००००

कोट: रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वे विभागाच्या अखत्यारीतील काम वेगात सुरू आहे. आम्हीसुद्धा आमच्या अखत्यारीतील काम पूर्ण करण्याबाबत एजन्सीला सूचना दिल्या असून, त्यांनी रेल्वेलाइनलगत आमच्या अखत्यारीतील कामाला सुरुवातही केली आहे. पुढील कामासाठी रेल्वेच्या स्लॅबचे काम पूर्ण होताच आमचे कामही सुरू करू.

- सुमीत मेश्राम,

उपकार्यकारी अभियंता,

सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम

090921\09wsm_1_09092021_35.jpg

उड्डाण पुलाच्या कामाने घेतला वेग