वाशिममध्ये वृक्षरोपणासाठी एकवटल्या महिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 15:26 IST2017-08-11T15:24:51+5:302017-08-11T15:26:30+5:30
वाशिममधील मानोरा तालुक्यातील छोटेसे गाव इंझोरी येथील महिलांनी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गावातील महिलांनी केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

वाशिममध्ये वृक्षरोपणासाठी एकवटल्या महिला
इंझोरी (वाशिम), दि. 11 - मानोरा तालुक्यातील छोटेसे गाव इंझोरी येथील महिलांनी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गावातील महिलांनी केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गणेश पाटील यांच्या आदेशावरुन इंझोरी ग्रामपंचायतच्यावतीने येथील ई क्लास जमिनीवर १० ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतच्यावतीने या कार्यक्रमात महिलांनी सहभाग नोंदवून एक आगळावेगळा उपक्रम राबविला. जि.प.सदस्य अनिताताई राऊत, पं.स.सदस्य मधुसुदन राठोड, पं.स.सदस्य गजानन भवाने, सरपंच विनोदवी अजय जयस्वाल, माजी पं.स.सदस्य धनराज दिघडे, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, तालुका कृषी अधिकारी गुलाब राठोड, विस्तार अधिकारी भगत, नायसे, श्रद्धा चक्रे, यांच्या मुख्य उपस्थितीत दुपारी १ वाजता इंझोरी व उंबर्डा येथील ई क्लास जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली.
या वृक्ष लागवडीकरिता गावातील ग्रा.पं.सदस्य संतोष बनकर, गजानन भोपळे, संदीप इंगोले, रामराव बारडे, गोपालीताई दिघडे, पार्वताबाई कºहाळे, कांताबाई येलदरे, देवानंद हळदे, नंदु पाटील, उपसरपंच रवि काळेकर, महिला बचत गटाच्या महिला, जि.प.मराठी शाळाचे शिक्षक ग्रामपंचायतचे कर्मचारी हरिदास काळेकर, मुरलीधर अलाटे, राजु पुंड, सचिन पुंड, रोजगार सेवक संतोष भोजापुरे आदिंनी या वृक्ष लागवडीमध्ये भाग घेऊन वृक्षांची मोठ्या प्रमाणत लागवड केली. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ग्रामविस्तार अधिकारी किसन वडाळ यांनी केलेत.