वाशिम भूमीअभिलेखच्या महिला कर्मचाऱ्यास लाच प्रकरणी अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 02:11 PM2019-02-04T14:11:14+5:302019-02-04T14:11:42+5:30

वाशिम: आजोबांची मालमत्ता वडिल व काकाच्या नावे केल्याबद्दल तक्रारकर्त्याकडून १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वाशिम भूमीअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचाºयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ फेब्रुवारी रोजी अटक केली.

Woman employee of Washim landrecord departmen arrested for bribe | वाशिम भूमीअभिलेखच्या महिला कर्मचाऱ्यास लाच प्रकरणी अटक 

वाशिम भूमीअभिलेखच्या महिला कर्मचाऱ्यास लाच प्रकरणी अटक 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: आजोबांची मालमत्ता वडिल व काकाच्या नावे केल्याबद्दल तक्रारकर्त्याकडून १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वाशिम भूमीअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचाºयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ फेब्रुवारी रोजी अटक केली.  किरण माधवराव काकडे, असे कर्मचाºयाचे नाव असून, सदर कर्मचारी परिरक्षण भूमापक या पदावर उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, वाशिम येथे कार्यरत आहे. 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार वाशिम भूमीअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी किरण काकडे यांनी तक्रारकर्त्याच्या आजोबांची मालमत्ता तक्रारकर्त्याचे वडिल आणि काका यांच्या नावे केल्याबद्दल १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, अशी तक्रार १६ आॅक्टोबर २०१८ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीवरून २२ आॅक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. दरम्यान आरोपी कर्मचाºयास तक्रारदारावर संशय आल्याने लाच स्विकारली नाही, यावरून ४ फेब्रुवारी २०१९ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास पथकाने आरोपीस ताब्यात घेतले आहे. या पथकात पो. नि. चव्हाण, पो. हवालदार दामोदर,खान, पो. ना. निशा,चालक खडसे आदिंचा समावेश होता.

Web Title: Woman employee of Washim landrecord departmen arrested for bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.