शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड येथे फिरती पाणपोई

By admin | Updated: April 23, 2017 19:39 IST

रिसोड- व्यापारी, ग्राहकांची तहान जागेवर जाऊन भागविण्यासाठी रिसोड येथे फिरत्या पाणपोईचा अभिनव उपक्रम गजानन महाराज संस्थान रिसोडच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

४० वर्षांची परपंरा: गजानन महाराज संस्थानचा उपक्र म रिसोड: आठवडी बाजारात विविध ठिकाणाहून येणाऱ्या व्यापारी, ग्राहकांची तहान जागेवर जाऊन भागविण्यासाठी रिसोड येथे फिरत्या पाणपोईचा अभिनव उपक्रम  गजानन महाराज संस्थान रिसोडच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यात मोप येथील ब्रिजलाल बगडे यांची महत्त्वाची भूमिका आहे. गेली ४० वर्षे ते हा उपक्रम राबवित आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. रखरखत्या उन्हात प्रत्येकच जीव पाण्यासाठी कासावीस होतो. अशात एखादवेळी जवळपास पाण्याची सोय नसली, तर हाती असलेले महत्त्वाचे काम सोडून पाण्यासाठी पळावे लागते. प्रामुख्याने बाजारातील ग्राहक व्यावसायिक, पाण्याची सोय नसलेल्या कार्यालयात कामासाठी आलेले लोक आदिंना ही समस्या जाणवते. अशाच लोकांची तहान भागविण्यासाठी मोप येथील डॉ.ब्रिजमोहन बगडे यांनी गजानन महाराज संस्थान मोपच्या माध्यमातून शहरात गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या दिवशी वाटर फिल्टरच्या कॅनच्या थंडगार पाण्याची व्यवस्था फिरत्या पाणपोईव्दारे केली आहे. डॉ.बगडे, स्वत:च्या वाहनातून आणलेल्या कॅनचे पाणी ह्यडिस्पोजेबलह्ण ग्लासच्या माध्यमातून बाजारात व गर्दीच्या ठिकाणी जावून लोकांना पाजतात. शहरात चौकात बऱ्याच ठिकाणी पाण्याची किंवा पाणपोई आहे. मात्र डॉ. बगडे यांनी थेट तहानलेल्यास व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याची तहान भागविण्यासाठी फिरती पाणपोईच रिसोड येथील आठवडी बाजारात सुरू केली आहे. विविध ठिकाणाहून येथे येणाऱ्या जनतेसह व्यापाऱ्यांना दिवसभर ते पाणी पाजत फिरतात. त्यांचा हा उपक्रम खरोखरच मानवतेची जाण असलेलाच आहे.