शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

मालेगाव तालुक्यातील १५ गावांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 14:39 IST

Washim News : मालेगाव तालुक्यातील १५ गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील १५ गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, १३ ठिकाणी विहिर अधिग्रहण करण्यात आले तर ३ गावात टँकरसाठी प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी एका गावात टँकर सूरु झाले आहे.दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरूवातीला मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी बºयापैकी पाऊस झाल्याने तसेच त्यानंतरही परतीच्या पावसामुळे प्रकल्पात बºयापैकी जलसाठा होता. जलपातळीतही फारशी घट नाही. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची तिव्रतादेखील कमी असल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी १५ पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली होती. जवळपास १२ ठिकाणी विहिर अधिग्रहण केले होते तर पाच ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा मे महिन्याच्या तिसºया आठवड्यातही तालुक्यातील ग्रामपंचायतीचा टँकरसाठीचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला नाही. आता तीन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुक्यातील पांगरी कुटे, शेलगाव बोदाडे, ब्राह्मणवाडा खुर्द, मानका, कोलही, वारंगी, बोर्डी, जउळका, वरदरी बुद्रुक, वरदरी खुर्द, राजुरा, गीव्हा कुटे, भेरा, खैरखेडा, पिंपळवाडी या गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. याशिवाय काही गावात शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणण्याची वेळ गावकºयांवर आली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा मंजूर आहे. परंतू, त्या तुलनेत प्रभावी अंमलबजावणी नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे टँकर, नळ दुरूस्ती, विहिर अधिग्रहण आदीबाबत फारसे प्रस्ताव नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.

 

बारा ठिकाणी विहिर अधिग्रहणतालुक्यातील १२ गावात विहिर अधिग्रहणाचे आदेश झाले असून, त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे गावकºयांना तुर्तास दिलासा मिळत असल्याचे दिसून येते.

 

आमच्याकडे जे प्रस्ताव आले, ते मंजुरीकरिता पाठवण्यात आले आहेत. अजून जे प्रस्ताव प्राप्त होतील, ते पाठवून पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल.श्रीनिवास पदमनवारगटविकास अधिकारी, पं स मालेगाव

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई