शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
4
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
5
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
6
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
7
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
8
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
9
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
10
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
11
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
12
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
13
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
14
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
15
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
17
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
18
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
20
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठयाचे ‘व्हॉल्व’ अस्वच्छतेत

By admin | Updated: July 24, 2014 23:01 IST

पाणीपुरवठा योजनेचे व्हॉल्व चक्क घाणपाण्यात अडकले असल्याचे वास्तव आहे.

शिरपूरजैन : येथील सरपंचांचा वार्ड असलेल्या तीनमध्ये पाणीपुरवठा योजनेचे व्हॉल्व चक्क घाणपाण्यात अडकले असल्याचे वास्तव आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य यंत्रणा अजूनही सुस्तच असल्याचे दिसून येत आहे.
शिरपूर गावाचे पुरातन नाव सिध्दपुर असून सध्या गावात असणार्‍या विविध समस्यामुळे या गावाला उपहासाने ह्यसमस्यापुरह्ण म्हटले जात आहे. येथील ग्राम पंचायतच्या नळयोजनेव्दारे गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या गावात ४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. गावाला पाणीपुरवठा करणार्‍यासाठी ग्राम पंचायतने गावामध्ये १0 ते १२ ठिकाणी व्हॉल्व बसविले आहेत. त्यापैकी सरपंच स्वत: निवडून आलेल्या वार्ड क्रमांक तीनमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशव्दारासमोरील व्हॉल्व हा घाणीच्या विळख्यात अडकला आहे. या व्हॉल्वच्या खड्यात घाणयुक्त चिखल असतो. घाणीत अडकलेल्या या व्हॉल्वमधूनच नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच याच वार्डात संतोष भालेराव यांच्या चहाच्या दुकानासमोरही व्हॉल्वच्या खड्यात प्रचंड घाण पाणी साचत असते. तेथे डुकरांचा दिवसभर मुक्त वावर असतो. आरोग्य विभाग गावातील पाणी नमुने तपासून, पाणी पिण्यास योग्य की अयोग्य याबाबतचा अहवाल देत असते. शिरपूर येथील पाणीपुरवठय़ाचे व्हाल्वच घाण पाण्यात असल्याने वार्ड तीनमधील पाणी पिण्यास योग्य की अयोग्य? असा अहवाल आजपर्यंतही आरोग्य विभागाने दिला नाही. जिल्हयात पेशी कमी होणार्‍या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती वाशिम येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी शिरपूर येथील खासगी डॉक्टरांना यापूर्वी दिली असल्याचे एका डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.