दारू प्यायल्यानंतर संपत्तीवरून वाद घालायचा, नेहमीच्या त्रासाला वैतागून बापानं पोटच्या पोराला संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 14:00 IST2025-04-12T13:58:47+5:302025-04-12T14:00:18+5:30
संपत्तीच्या वादातून एका वक्तीने पोटच्या मुलाची हत्या केली. ही घटना वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे शनिवारी घडली.

दारू प्यायल्यानंतर संपत्तीवरून वाद घालायचा, नेहमीच्या त्रासाला वैतागून बापानं पोटच्या पोराला संपवलं
वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे एका व्यक्तीने पोटच्या ४० वर्षीय मुलाची हत्या केली. दारुड्या मुलाकडून वारंवार होणारा त्रास असह्य झाल्याने जन्मदात्या पित्याने मुलाच्या पोटात चाकू भोसकून त्याची हत्या. याप्रकरणी कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पित्याला अटक करण्यात आली. ही घटना शनिवारी (१२ एप्रिल २०२५) सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मोखडकर असे हत्या झालेल्या मुलाचे आहे. तर, गोपाल मोखडकर असे आरोपी पित्याचे नाव आहे. मयत आणि आरोपी आपल्या कुटुंबासोबत कारंजा शहराजवळी कारंजा बायपास येथे राहायला आहेत. अनिलला दारूचे व्यसन होते. दारु प्यायल्यानंतर तो वारंवार संपत्तीवरून कुटुंबासोबत वाद घालायचा, अशी माहिती आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी पुन्हा एकदा अनिल हा गोपाल यांच्याशी संपत्तीवरून वाद घालू लागला. त्यानंतर हा इतका पेटला की, रागाच्या भरात गोपाल यांनी अनिलच्या पोटात चाकून भोसकला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अनिलचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि गोपाल यांना ताब्यात घेतले. या प्रकरणाची पुढील चौकशी कारंजा शहर पोलीस करत आहेत. जन्मदात्या पित्याने मुलाची हत्या केल्याची बातमी समजता च परिरसरात एकच खळबळ माजली आहे.