Washim: भाजपाच्या जनसंपर्क रॅलीत पाकिटमार चोरट्यांचा धुमाकूळ

By सुनील काकडे | Updated: August 26, 2023 18:59 IST2023-08-26T18:58:21+5:302023-08-26T18:59:01+5:30

Washim: वाशिम शहरात २४ ऑगस्ट रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंपर्क रॅली काढण्यात आली.

Washim: In BJP's public relations rally, there was a flurry of pickpocket thieves | Washim: भाजपाच्या जनसंपर्क रॅलीत पाकिटमार चोरट्यांचा धुमाकूळ

Washim: भाजपाच्या जनसंपर्क रॅलीत पाकिटमार चोरट्यांचा धुमाकूळ

- सुनील काकडे
वाशिम -  शहरात २४ ऑगस्ट रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंपर्क रॅली काढण्यात आली. यावेळी जमलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत पाकिटमार चोरट्यांनी धुमाकूळ घालत भाजपा जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या खिशातील पर्स लांबविले. याप्रकरणी २६ ऑगस्ट रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहायक सुभाष सुरोशे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

२४ ऑगस्ट रोजी निघालेल्या भाजपाच्या जनसंपर्क रॅलीत अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी झाली होती. या गर्दीत पाकिटमार चोरट्यांनी प्रवेश करून आपला डाव साधला. आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहायक सुभाष सुरोशे यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष शाम बढे, मानोरा तालुकाध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अजय जयस्वाल, गजानन डहाके, व्यापारी गोविंद वर्मा, आनंद चरखा, नगर सेवक गाैतम भालेराव यांच्यासह अन्य १० ते १२ जणांच्या खिशातील पर्स चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी सुभाष सुरोशे यांनी वाशिम शहर पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Washim: In BJP's public relations rally, there was a flurry of pickpocket thieves