शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

वाशिम : हगणदरीमुक्तीत अडथळा ठरणा-या ग्रामसेवकांवर कारवाईची ‘टांगती तलवार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 7:56 PM

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय उभारण्याच्या बाबतीत वाशिम तालुका हा सर्वांत पिछाडीवर असून या मोहिमेत अडथळा ठरू पाहणा-या ग्रामसेवकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत आयुक्त पियुश सिंह यांनी दिले. 

ठळक मुद्देआयुक्त पियुश सिंह यांचा इशाराकठोर कारवाई करण्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय उभारण्याच्या बाबतीत वाशिम तालुका हा सर्वांत पिछाडीवर असून या मोहिमेत अडथळा ठरू पाहणा-या ग्रामसेवकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत आयुक्त पियुश सिंह यांनी दिले. वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहात गुरूवार, ८ फेब्रुवारीला पार पडलेल्या ग्रामसेवकांच्या आढावा सभेत आयुक्त सिंह यांनी ग्रामसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी  अधिकारी संजय कापडणीस, सहाय्यक उपायुक्त प्रिती देशमुख, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्ह्यातील कारंजा व मंगरूळपीर तालुका हगणदरीमुक्त झाल्यानंतर उर्वरित चारही तालुक्यांमध्ये शौचालय उभारणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, शासनाने निर्धारित केलेल्या तारखांना तालुके हगणदरीमुक्त झाले नाहीत. वाशिम तालुका याबाबतील प्रचंड प्रमाणात पिछाडीवर असून २०० पेक्षा अधिक शौचालयांचे बांधकाम अद्याप बाकी आहे. त्यात अनसिंग, सावरगाव जीरे, पंचाळा, शेलगाव आणि वार्ला या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांच्या कार्यक्षमतेवर आयुक्त पियुश सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तथापि, येत्या सात दिवसात समाधानकारक काम न झाल्यास संबंधित ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश सिंह यांनी दिले. त्याचबरोबर नमूद पाच ग्रामपंचायती वगळता ज्या ग्रामपंचायतचे शौचालय बांधकामाचे लक्ष्य (टार्गेट) ७० टक्क्याच्या वर आहे, त्यांना १८ फेब्रुवारी आणि ज्यांचे लक्ष्य ७० टक्क्याच्या आत आहे, त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत  मुदत देण्यात आली. या कालावधीत काम न झाल्यास ग्रामसेवकांवर कारवाई करताना कुठलीच हयगय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी यावेळी दिला. 

टॅग्स :washimवाशिमzpजिल्हा परिषद