ग्रामसभा घेण्यासाठी ग्रामसेवक धास्तावले; संरक्षण नसल्याने ग्रामसेवकांवर हल्ले वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:05 AM2018-01-17T02:05:04+5:302018-01-17T02:05:17+5:30

अकोला : राष्ट्रीय सण म्हणून साजरा केल्या जाणार्‍या स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकदिनी गावातील ग्रामसभांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाद होतात. त्या वादात ग्रामसेवकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. ते होऊ नये, यासाठी त्या दिवशीच्या ग्रामसभा ग्रामसेवक घेणार नाहीत, त्याऐवजी सात दिवसांनंतर ती सभा घेण्यात येईल, असे पत्र महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे, सचिव महेंद्र बोचरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहे.

Gramsevak threatens to get gram sabha; Gramsevaks attacked due to lack of protection! | ग्रामसभा घेण्यासाठी ग्रामसेवक धास्तावले; संरक्षण नसल्याने ग्रामसेवकांवर हल्ले वाढले!

ग्रामसभा घेण्यासाठी ग्रामसेवक धास्तावले; संरक्षण नसल्याने ग्रामसेवकांवर हल्ले वाढले!

Next
ठळक मुद्देप्रजासत्ताकदिनी गावातील ग्रामसभांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाद होतात

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राष्ट्रीय सण म्हणून साजरा केल्या जाणार्‍या स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकदिनी गावातील ग्रामसभांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाद होतात. त्या वादात ग्रामसेवकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. ते होऊ नये, यासाठी त्या दिवशीच्या ग्रामसभा ग्रामसेवक घेणार नाहीत, त्याऐवजी सात दिवसांनंतर ती सभा घेण्यात येईल, असे पत्र महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे, सचिव महेंद्र बोचरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहे.
 १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन्ही दिवशी होणार्‍या ग्रामसभा वादळी होतात. त्यामध्ये ग्रामसेवकांना मारहाण, शिवीगाळ करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, दप्तर पळविणे, ते फाडून टाकणे, यासारखे प्रकार घडतात. त्या सभांना पोलीस संरक्षण मागितल्यास ते मिळत नाही. त्यामुळे समाजकंटकांच्या हल्ल्याला एकटा ग्रामसेवक बळी पडतो. या सगळ्या प्रकारांचा विचार केल्यानंतर ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने त्या दिवशी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अकोला जिल्हय़ातही सभांना पोलीस संरक्षण दिल्या जात नाही, तोपर्यंत या दोन्ही राष्ट्रीय सणांच्या दिवशी ग्रामसेवक ग्रामसभा घेणार नाहीत, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

- १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन्ही राष्ट्रीय सणाच्या दिवशी राज्यभरात ग्रामसभा घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्या दिवशी नागरिक सण साजरे करीत असताना ग्रामसेवकाला नागरिक व असामाजिक तत्त्वाच्या हल्ल्यांना बळी पडावे लागते.

Web Title: Gramsevak threatens to get gram sabha; Gramsevaks attacked due to lack of protection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.