वाशिम जिल्ह्यात आजपासून प्रतिष्ठाने ५ वाजेपर्यंत राहणार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 11:30 AM2020-08-01T11:30:05+5:302020-08-01T11:30:59+5:30

जिल्ह्यात यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

in Washim district Shops will remain open till 5 pm from today | वाशिम जिल्ह्यात आजपासून प्रतिष्ठाने ५ वाजेपर्यंत राहणार सुरु

वाशिम जिल्ह्यात आजपासून प्रतिष्ठाने ५ वाजेपर्यंत राहणार सुरु

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार असून याबाबतची सुधारित नियमावली १ आॅगस्ट २०२० पासून लागू करण्यात येत आहे. जिल्ह्यात यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच दवाखाने (पशुवैद्यकीय दवाखान्यांसह), मेडिकल स्टोअर्स २४ तास सुरु राहतील. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास अथवा अशा ठिकाणी गर्दी आढळून आल्यास या आस्थापना, दुकाने बंद करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
नवीन नियमावलीनुसार कृषि उत्पन्न बाजार समितीमधील सर्व प्रकारची कामे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. दुध संकलन व विक्री, भाजीपाला बाजार सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवता येईल. सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत केवळ दुध संकलनास मुभा राहील, याकाळात दुध विक्री करता येणार नाही. पिण्याचे पाणी, घरगुती गॅस घरपोच करण्यास सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुभा राहील. जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीतील पेट्रोलपंप सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, तर नगरपालिका हद्दीबाहेरील पेट्रोलपंप २४ तास सुरु ठेवता येतील. सर्व बँका सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. महामार्गांची कामे पूर्वीप्रमाणे सुरु राहतील. लग्न समारंभ, अंत्यविधीसाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाच्या अधीन राहून जास्तीत जास्त २० व्यक्तींना परवानगी राहील. लग्न समारंभाचा कार्यक्रम वगळता इतर सामुहिक भोजनाच्या कार्यक्रमास बंदी राहील. खुल्या मैदानावर, लॉन्सवर, वातानुकुलीत नसलेल्या हॉलमध्ये २० व्यक्तींच्या मयार्देत लग्नसोहळा संबंधित कार्यक्रम शासनच्या २३ जून २०२० रोजीच्या आदेशाच्या अधीन राहून करता येतील.


हे राहणार बंद
सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस इत्यादी बंद राहतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर आतिथ्य सेवा, सिनेमागृह, जिम्नॅशियम, जलतरण तलाव बंद राहतील. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व सर्व प्रकारच्या मेळाव्यांवर बंदी राहणार आहे. सर्व धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषद, धार्मिक मेळावे भरविता येणार नाहीत. आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद राहतील.सामुहिक खेळ खेळण्यास बंदी राहील.

हे राहणार सुरु
शिकविण्याच्या उद्देशाशिवाय इतर बाबींसाठी जसे, पेपर तपासणी, निकाल घोषित करणे, ई-लर्निंग, ई-सामग्री तयार करण्यासाठी शाळांचे कामकाज सुरु राहिल. विलगीकरणासाठी परवानगी दिलेल्या हॉटेल्स ,आऊटडोअर खेळांना मुभा, क्रीडा संकुलाचा बाह्य परिसर, मैदाने नागरिकांना व्यायामासाठी खुली राहतील. व्यायामासाठी जाणा?्या व्यक्तींनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक राहील. जिम्नॅस्टिक्स, टेनिस, मैदानावरील बॅडमिंटन आणि मल्लखांब अशा आऊटडोअर असांघिक खेळांना ५ आॅगस्टपासून स्वच्छता विषयक उपायांसह परवानगी देण्यात येत आहे. सलून, स्पा, हेअर कटिंगची दुकाने, ब्युटी पार्लर्स या अगोदर निर्गमित केलेल्या बंधनांसह सुरु राहतील.

दुचाकीवर दोघांना मुभा
दुचाकीवरून दोन व्यक्तींना प्रवासाची मुभा राहील. तीन चाकी वाहनांमध्ये चालक व दोन व्यक्तींना, तर चारचाकी वाहनांमध्ये चालक व ३ व्यक्तींना प्रवास करण्यास मुभा राहील.

 

Web Title: in Washim district Shops will remain open till 5 pm from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.