शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

वाशिम जिल्हा : चार तालुक्यातील ४० महिलांना  शेतमजुर महिलांना एकचाकी हातकोळप्यांचे वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 17:19 IST

रिसोड: आत्माच्यावतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्यावतीने शिफासित केलेल्या एकचाकी हातकोळप्यांचे प्रशिक्षण ग्रामीण भागातील शेतमजुर महिलांना देण्यात येत आहे.

ठळक मुद्दे करडा कृषी विज्ञान केंद्राच्या गृहशाखेकडून ४० महिलांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देऊन हातकोळप्यांचे वाटप करण्यात आले. या हातकोळप्याचा वापर २२.५ सेमी, ३० सेमी व ४५ सेमी अंतर असलेल्या  दोन ओळीतील पिकांसाठी केला जातो. एकचाकी हातकोळप्याचा वापर केल्यास ५० ते ६० टक्के वेळेची आणि पैशाची बचत होऊ शकते.

 

रिसोड: आत्माच्यावतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्यावतीने शिफासित केलेल्या एकचाकी हातकोळप्यांचे प्रशिक्षण ग्रामीण भागातील शेतमजुर महिलांना देण्यात येत आहे. या अंतर्गत रिसोड येथील करडा कृषी विज्ञान केंद्राच्या गृहशाखेकडून चार तालुक्यातील ४० महिलांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देऊन हातकोळप्यांचे वाटप त्यांना करण्यात आले.

कृषी विज्ञान केंद्र करडा येथे आयोजित या प्रशिक्षण आणि हातकोळपे वाटप कार्यक्रमाला आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. डी. एल. जाधव, उपसंचालक अनिसा महाबळे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे, विस्तार शिक्षण विषय विशेषज्ञ एस. के. देशमुख, कार्यक्रम सहाय्यिका ए. एन. वाटाणे यांची उपस्थिती होती. यावेळी ए. एन. वाटाणे यांनी उपक्रमाबाबत शेतमजुर महिलांना माहिती दिली. शेतीत आंतरमशागतीच्या कामात महिलांचा मोठा सहभाग असतो. ही कामे करीत असताना बरेचदा त्यांची शारीरिक स्थिती अनैसर्गिक होते. त्यामुळे शारीरिक थकवा येऊन कार्यक्षमता कमी होते आणि कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठीचे व मानेचे आजार कायमस्वरूपी उद्भवतात म्हणूनच शरिराच्या अवयवांचे संतुलन राखून काम करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले, तसेच एकचाकी हातकोळपे ढकला व चालवा पद्धतीचे असून, वापरण्यास सोयीचे आहे. या हातकोळप्याचा वापर २२.५ सेमी, ३० सेमी व ४५ सेमी अंतर असलेल्या  दोन ओळीतील पिकांसाठी केला जातो. एकचाकी हातकोळप्याचा वापर केल्यास ५० ते ६० टक्के वेळेची आणि पैशाची बचत होऊ शकते, असेही त्यांनी सादरीकरणासह पटवून दिले. डॉ. जाधव यांनी उपस्थित लाभार्थी महिलांना शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची चर्चा करून शेतीमधील उत्पादनात वाढ करण्याचे आवाहन केले, तर डॉ. काळे यांनी शेतीपुरक व्यवसायातील तंत्रज्ञान महिलांनी अवगत करून चुल आणि मुल या पलिकडे जाऊन चौकसवृत्ती ठेवावी, असे सांगितले. अनिसा महाबळे यांनी आत्माची कार्यपद्धती आणि महिलांनी त्याच्या उपयोग कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. एस. के. देशमुख यांनी कृविकेच्या तांत्रिक बाबी, सेवा व स्वंयरोजगार प्रशिक्षणाबाबत माहिती देऊन राज्यस्तरी अ‍ग्रोटेक २०१७ च्या प्रदर्शनीत सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला वाशिम, मंगरुळपीर, मानोरा आणि रिसोड तालुक्याील महिला लाभार्थी उपस्थित होत्या. 

टॅग्स :washimवाशिम