वाशिम : सैनिक शाळेतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 17:39 IST2017-12-28T17:38:10+5:302017-12-28T17:39:47+5:30
वाशिम : शहरापासून ६ कि़मी. अंतरावर असलेल्या यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेतील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना २८ डिसेंबरला सकाळी ९:३० वाजताचे सुमारास घडली.

वाशिम : सैनिक शाळेतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू
वाशिम : शहरापासून ६ कि़मी. अंतरावर असलेल्या यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेतील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना २८ डिसेंबरला सकाळी ९:३० वाजताचे सुमारास घडली.
सुपखेला (ता.जि.वाशिम) येथील यशवंतराव सैनिक शाळेमध्ये धनराज एकनाथ जावळे (रा. बोराळा ता. मालेगाव जि. वाशिम) हा विद्यार्थी इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत होता. धनराज जावळे हा शाळेतीलच निवासी वसतिगृहामध्ये वास्तव्यास होता. जावळे याचे छातीमध्ये दुखत असल्याचे त्याने आपल्या मित्राला सांगितल्यावर लगेचच वसतीगृह प्रशासनाने जावळे याला शहरातील खासगी रूग्णालयामध्ये उपचारासाठी घेऊन गेले. परंतू खासगी रूग्णालयामध्ये पोहचण्या आधीच जावळे याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शाळेतील त्याचे वर्गमित्र, शिक्षक व इतर कर्मचाºयांमध्ये दु:खाचे वातावरण पसरले आहे.