Washim: Already 'locked down', unseasonal rain hit agriculture | वाशिम: आधीच ‘लॉक डाऊन’ त्यात अवकाळीचा फटका

वाशिम: आधीच ‘लॉक डाऊन’ त्यात अवकाळीचा फटका

ठळक मुद्दे१८ मार्चच्या मध्यरात्री वादळी वाºयासह झालेला पाऊस आणि गारपिट झाली.रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज.

लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपर्यंत ‘लॉक डाऊन'चे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसामपासून सर्वच कामे बमद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी त्वारी गहू, हरभरा पिकाच्या काढणीसह फळपिकांची तोडणी करता आली नाही. अशातच जिल्हाभरात बुधवार २५ मार्च रोजी रात्ऱी आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसल्याने शेतकरी अधिकच संकटात फसला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य आणि केंद्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. यासाठी विमानसेवा, रेल्वेसेवा, एसटी बसही बंद करण्यात आल्या, तर सार्वजनिक ठिकाणावर होणाºया गर्दीमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती लक्षात घेत. २२ मार्चला जनता कफ्यू, त्यानंतर १४४ कलम आणि मंगळवारपासून ‘लॉक डाऊन’चे आदेशही जारी करण्यात आले. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना शेतात काढणीवर आलेला गहू आणि हरभºयाची काढणी करणे शक्य झाले नाही, तर काहींना काढून ठेवलेली ही पिके घरीही आणता आली नाहीत. त्यात बुधवारी रात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, गहू, हरभरा पिकांसह फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच जिल्ह्यात मंगळवार १७ मार्च आणि बुधवार १८ मार्चच्या मध्यरात्री वादळी वाºयासह झालेला पाऊस आणि गारपिट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे ५००८ शेतकºयांच्या ४८२५.५ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला होता. त्यात आता २५ मार्च रोजी रात्री आलेल्या पावसाने अधिकच भर टाकली आहे. आसेगाव परिसरात अवकाळी पावसाने नांदगाव, शिवनी, चिंचखेड, चिंचोली, पिंपळगाव, कुंभी या गावातील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.


बुधवारी रात्री आलेल्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाची माहिती संकलित केली. तथापि, प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झाल्याचे आढळले नाही. प्रत्यक्ष पाहणीनंतर नुकसानाचे प्रमाण कळू शकेल.
-एस. एम. तोटावार,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: Washim: Already 'locked down', unseasonal rain hit agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.