मतदाराच्या सेवेसाठी मतदार साह्यता केंद्र सज्ज

By Admin | Updated: September 27, 2014 23:55 IST2014-09-27T23:55:57+5:302014-09-27T23:55:57+5:30

वाशिमचे तहसीलदार आशिष बिजवल यांची माहिती.

Voters' support centers are ready for voter service | मतदाराच्या सेवेसाठी मतदार साह्यता केंद्र सज्ज

मतदाराच्या सेवेसाठी मतदार साह्यता केंद्र सज्ज

वाशिम: आगामी विधानसभा निवडणुकीत वाशिम मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी माद्तर जागृती मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. त्याचबरोबर प्रत्येक मतदाराला त्याच्या मतदान केंद्राविषयी सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न वाशिम तहसीलदार कार्यालय करत आहे. त्यासाठी मतदार सहाय्यता केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती तहसीलदार तथा वाशिम म तदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी दिली.
मतदार सहाय्यता केंद्राविषयी अधिक माहिती देताना बिजवल म्हणाले कि, या केंद्रामधून प्रत्येक म तदाराला आपले नाव सांगितल्यानंतर आपल्या मदतन केंद्राची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच त्याला मतदान यंत्राविषयीहि माहिती दिली जाणार आहे. मतदान केंद्रात गेल्यानंतर त्याला कोण-कोणत्या टप्प्यातून जावे लागेल, मतदान केंद्राची रचना कशी असेल हे मतदाराला समजावे म्हणून याठिकाणी एका आदर्श मतदान केंद्राची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.

Web Title: Voters' support centers are ready for voter service