भाजीपाला महागला; महिलांचे ‘बजेट’ कोलमडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 04:42 PM2019-07-29T16:42:01+5:302019-07-29T16:42:07+5:30

वाशिम : आवक घटल्याने भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. या महागाईमुळे महिलांचे बजेट कोलमडून गेले असून, अजून किती दिवस भाजीपाल्याचे दर चढते राहतील, याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही, असा दावा भाजी विक्रेत्यांनी केला.

Vegetables expensive; Women's 'budget' collapses! | भाजीपाला महागला; महिलांचे ‘बजेट’ कोलमडले !

भाजीपाला महागला; महिलांचे ‘बजेट’ कोलमडले !

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आवक घटल्याने भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. या महागाईमुळे महिलांचे बजेट कोलमडून गेले असून, अजून किती दिवस भाजीपाल्याचे दर चढते राहतील, याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही, असा दावा भाजी विक्रेत्यांनी केला.
ग्रामीण भागातून शहरात येणाºया भाजीपाल्याची आवक कमी झाली की भाव वधारतात, हा नेहमीचाच अनुभव आहे. आवक जास्त झाली तर भाव कमी होतात असे चढउतार पाहावयास मिळतात. मागील महिन्याच्या तुलनेत आता हे भाव दीड ते दोन पटीने वाढल्याचे दिसून येते. या महागाईमुळे रोजमजुरी करणाºयांना भाजीपाला विकत घेणे कठीण होवून बसले आहे. रविवारी वाशिमच्या भाजीमंडीत भाजीपाला महाग झाल्याचे दिसून आले. मेथी ३० रुपये पाव, कोबी ३० रुपये पाव, वांगे २० रुपये अर्धा किलो, टमाटे    १५ रुपये अर्धा किलो, दोडके १५ ते २० रुपये पाव, सांभार १० ते १५ रुपये छटाक,  शेवग्याच्या शेंगा ३० रुपये पाव, गवार १५ रुपये पाव, पालक १० रुपये पाव,  हिरवी मिरची २० रुपये पाव, भेंडी १५ रुपये पाव, लसून ३० ते ४० रुपये पाव असे भाजीपाल्याचे दर होते. या वधारलेल्या बाजारभावामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असून, स्वयंपाकगृहातून महागडा भाजीपाला तुर्तास गायब होत असल्याचे दिसून येते.
 
कांदा, बटाटे, कारले आटोक्यात
आवक कमी झालेल्या भाजीपाला महागला तर आवक जैसे थे असलेला भाजीपाला आटोक्यात असल्याचे दिसून येते. कारल्याची आवक वाढल्याने बाजारभाव कमी झाले आहेत. एरव्ही १५ रुपये पाव असा दर असलेले कारल्याचे दर आता १५ रुपयात अर्धा किलो झाले आहेत. कांदा व बटाटे २० रुपयात एक किलो असे स्थिर दर आहेत.

Web Title: Vegetables expensive; Women's 'budget' collapses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.