रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 17:24 IST2021-07-21T17:24:14+5:302021-07-21T17:24:31+5:30
Unidentified man dies after falling from train : पुर्णा-अकोला या पॅसेंजर (डेमू) रेल्वेतून पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २१ जुलै रोजी घडली.

रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू
जऊळका रेल्वे : सोमवारी सुरू झालेल्या पुर्णा-अकोला या पॅसेंजर (डेमू) रेल्वेतून पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २१ जुलै रोजी जऊळका रेल्वे स्थानकानजीक सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. मृतकाची ओळख पटली नाही.
गत दीड वर्षांपासून बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे आता सुरू होत आहेत. सोमवार, १९ जुलै रोजी पुर्णा-अकोला ही पॅसेंजर (डेमू) रेल्वे वाशिममार्गे सुरू झाली. २१ जुलै सकाळी १०.३० ते ११ वाजेदरम्यान पूर्णा ते अकोला या रेल्वेतून जऊळका रेल्वे स्थानकानजीक अनोळखी ४५ वर्षीय इसम खाली पडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अनोळखी इसमाच्या अंगावर लाल रंगाचे टी शर्ट असून त्यावर एअरटेल नाव लिहिलेले आहे. या घटनेचा पुढील तपास जऊळका पोलीस करीत आहेत