आणखी दोन पॉझिटिव्ह; एक कोरोनामुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST2021-09-09T04:49:21+5:302021-09-09T04:49:21+5:30

पहिल्या लाटेपेक्षा दुस-या लाटेत जनजीवन प्रभावित झाले होते. जून महिन्यापासून कोरोनाची लाट ओसरत असून, रुग्णसंख्यादेखील एका अंकात येत आहे. ...

Two more positives; A corona free! | आणखी दोन पॉझिटिव्ह; एक कोरोनामुक्त !

आणखी दोन पॉझिटिव्ह; एक कोरोनामुक्त !

पहिल्या लाटेपेक्षा दुस-या लाटेत जनजीवन प्रभावित झाले होते. जून महिन्यापासून कोरोनाची लाट ओसरत असून, रुग्णसंख्यादेखील एका अंकात येत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. बुधवारी नव्याने दोन रुग्ण आढळले तर एका जणाने कोरोनावर मात केली. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,७२८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१,०७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

००००

१६ सक्रिय रुग्ण

बुधवारच्या अहवालानुसार नवीन दोन रुग्ण आढळून आले तर एका जणाने कोरोनावर मात केली. सध्या गृहविलगीकरणात १६ रुग्ण असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

.....

चार तालुके निरंक

बुधवारच्या अहवालानुसार वाशिम व रिसोड तालुक्यात प्रत्येकी एक असे एकूण दोन रुग्ण आढळून आले. उर्वरित कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर व मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.

Web Title: Two more positives; A corona free!