कारंजा-मानोरा मार्गाव दुचाकी अपघातात दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 16:20 IST2018-11-03T16:19:59+5:302018-11-03T16:20:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा ( वाशिम ): दुचाकीचा अपघात घडून दोघे जण जखमी झाल्याची घटना कारंजा-मानोरा मार्गावर ३ नोव्हेंबर ...

कारंजा-मानोरा मार्गाव दुचाकी अपघातात दोघे जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (वाशिम): दुचाकीचा अपघात घडून दोघे जण जखमी झाल्याची घटना कारंजा-मानोरा मार्गावर ३ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी विळेगाव ग्रामपंचायतच्या रुग्णवाहिकेचा आधार घेण्यात आला.
धामणी येथील अनिल वरती (३२) आणि गिंभा येथील डॉ. तुषार राठोड हे दोघे दुचाकीने मानोराकडून कारंजा येथे येत होते. कारंजा शहरालगत बायपास परिसरात समोरून येणाºया दुचाकीला त्यांच्या दुचाकीची जबर धडक बसली. या अपघातात अपघातात डॉ. राठोड आणि अनिल वरती हे दोघे जखमी झाले. त्यांना मदत करण्यासाठी सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे अनिल सुर्वे आणि संस्थेचे प्रमुख श्याम सवाई घटनास्थळी दाखल झाले. यावेळी विळेगाव ग्रामपंचायतने वॉटर कपच्या पुरस्कारातून घेतलेली रुग्णवाहिका बोलावून त्याद्वारे जखमींना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विळेगावचे संतोष घुले, अनिल पवार, संजय चव्हाण, दिपक वाघमारे यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केली.