दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 15:38 IST2018-05-09T15:38:20+5:302018-05-09T15:38:20+5:30
कारंजा : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून त्यामध्ये दोन जण जखमी झाल्याची घटना ८ मे रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास पसरणी फाट्यानजिक घडली.

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण जखमी
कारंजा : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून त्यामध्ये दोन जण जखमी झाल्याची घटना ८ मे रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास पसरणी फाट्यानजिक घडली.
प्रफुल्ल देविदास राठोड वय २० वर्ष रा गिर्डा व कनिराम बळीराम राठोड वय ३७ वर्ष रा. सिंदखेड अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. प्रफुल्ल राठोड हे एम. एच ३७ एस ३४४९ क्रमांकाच्या दुचाकीने कारंजाहून गिर्डाकडे जात असतांना विरूध्द दिशेने येणाºया एम. एच ३७ ७४४५ क्रमांकाच्या दुचाकीने समोरासमोर धडक दिली. यात प्रफुल्ल देविदास राठोड व कनिराम बळीराम राठोड जखमी झाले. जखमी व्यक्तींना सास रूग्णवाहिकेच्या मदतीने प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचारानंतर जखमीमधील कनिराम राठोड यांना पुढील उपचारासाठी अमरावीत येथे रवाना करण्यात आले. दरम्यान या संदर्भात कारंजा शहर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास पोलिस करीत आहे.