शिक्षक दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST2021-09-07T04:50:21+5:302021-09-07T04:50:21+5:30

मंगरुळपीर मंगरुळपीर : शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी ध्यास कार्यालय येथे अश्विनी राम औताडे यांनी ध्यास व जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने ...

Tree planting program on the occasion of Teacher's Day | शिक्षक दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

शिक्षक दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

मंगरुळपीर

मंगरुळपीर : शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी ध्यास कार्यालय येथे अश्विनी राम औताडे यांनी ध्यास व जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषद विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षण अधिकारी सुभाष पवणे होते. आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन असल्याचे औताडे यांनी यावेळी सांगितले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष लावणे ही काळाची गरज आहे .कोणत्या ना कोणत्या माध्यमातून वृक्ष लागले पाहिजे. वृक्ष लावून ते जगवले पाहिजे, वृक्ष जगले तरच आपण जगू त्यामुळे वृक्ष लागवड करावी, असे आवाहन यावेळी औताडे यांनी केले. यावेळी प्राचार्य आंबेकर, शिक्षक काईट, सोनवणे यांच्यासह चंदा ठाकूर, ज्योती भुतडा, शिल्पा मांढरे, मेघा नागरकर, शुभांगी भोजने, अबोली घळे, कल्याणी काळे व नंदिनी, खुशी या दोन लहान मुलींनीही वृक्षारोपण केले.

Web Title: Tree planting program on the occasion of Teacher's Day