शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलीस रात्री उशिरापर्यंत राहणार चौकात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 15:22 IST

लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात बदल करण्यात आला असून आता ते रात्री उशिरापर्यंत चौकात उभे राहणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील वाहतुकीला वळण लागावे, वाहतूक प्रभावित होऊ नये याकरिता वाशिम शहर वाहतूक शाखा व नगरपरिषदेच्यावतिने मोहीम हाती घेण्यात आली. या मोहीमेंतर्गंत सर्वात गजबजलेला रस्ता दिवसभर मोकळा राहत होता, परंतु संध्याकाळी ६ वाजता शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची डयुटी संपली की, संपूर्ण रस्ता फेरीवाल्यांनी अडविला जात होता. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात बदल करण्यात आला असून आता ते रात्री उशिरापर्यंत चौकात उभे राहणार आहेत.वाशिम शहरातील सर्वात गजबजलेल्या पाटणी चौक ते शिवाजी चौक दरम्यान होत असलेल्या अस्ताव्यस्त वाहतुकीला शहर वाहतूक शाखा, वाशिम नगरपरिषदेच्यावतिने वळण लावण्यात आले होते. सततच्या कारवाईने लघुव्यावसायिकांनी रस्त्यावर आपली दुकाने थाटणे बंद केले होते, परंतु गत दोन दिवसांपासून शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाºयांचे कर्तव्य संपले की, रस्त्यावर बाजार भरण्यास सुरुवात होत आहे. यामुळे पुन्हा वाहतूक प्रभावित होण्याच्या प्रकारात वाढ झाली होती या संदर्भात ११ डिसेंबर रोजी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तांत पोलीस अधिक्षकांशी चर्चा करुन नियोजन करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. यावरुन शहर वाहतूक शाखा निरिक्षक राजू वाटाणे यांनी संबधितांशी चचौ करुन शहर वाहतूक शाखेच्या पाटणी चौकातील संध्याकाळी ६ वाजता संपत असणारे कर्तव्यात बदल करुन दोन शिफ्ट तयार केल्यात. आता पाटणी चौकामध्ये रात्री ९ वाजेपर्यंत शहर वाहतूक शाखा कर्मचारी कर्तव्य बजावून रस्त्यावर उभ्या राहणाºया वाहनांवर, फेरीवाल्यांवर कारवाई करुन याला रोख देण्यात येणार आहे. त्यामुळे आता संध्याकाळच्या अस्ताव्यस्त वाहतुकीपासूनही नागरिकांना मुक्तता मिळणार आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यात येत असतांना संध्याकाळी शहरातील रस्त्यावर उभी होत असलेल्या वाहनांमुळे कर्मचाºयांच्या दोन शिफ्ट करण्यात आल्या आहेत. आता पाटणी चौकात रात्री ९ वाजेपर्यंत कर्मचारी हजर राहणार आहेत.- राजू वाटाणे, शहर वाहतूक शाखा निरिक्षक, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमtraffic policeवाहतूक पोलीस