शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

१३ वर्षापासून जपली ‘कॅण्डल मार्च’ची परंपरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 3:05 PM

 ६ डिसेंबर रोजी देखील जिल्हाभरात पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढला. 

ठळक मुद्दे२००६ मध्ये ‘कॅण्डल मार्च’ काढण्याला आंबेडकरी अनुयायांनी सुरूवात केली होती. महामानवाच्या पुतळ्याजवळ चारही बाजूने गोलाकार स्थितीत ‘कॅण्डल’ लावली जाते.सामुहिक बुद्धवंदना घेऊन पंचशील, त्रिशरण ग्रहण केले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पहाटेच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढून अभिवादन करण्याची परंपरा गत १३ वर्षांपासून वाशिम जिल्ह्यात जपली जात आहे.   ६ डिसेंबर रोजी देखील जिल्हाभरात पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी वाशिम येथे साधारणत: २००६ मध्ये ‘कॅण्डल मार्च’ काढण्याला आंबेडकरी अनुयायांनी सुरूवात केली होती. ६ डिसेंबरला पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास शहराच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव व आंबेडकरी अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येतात. प्रत्येकजण हातात ‘कॅण्डल’ घेऊन चौकात आल्यानंतर महामानवाच्या पुतळ्याजवळ चारही बाजूने गोलाकार स्थितीत ‘कॅण्डल’ लावली जाते. त्यानंतर सामुहिक बुद्धवंदना घेऊन पंचशील, त्रिशरण ग्रहण केले जाते.२००६ पासून सुरू झालेली ‘कॅण्डल मार्च’ची परंपरा अविरत जोपासून यावर्षीही ६ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढून अभिवादन केले.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर