शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
4
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
5
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
6
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
7
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
8
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
9
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
10
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
11
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
12
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
13
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
14
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
15
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
16
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
17
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
18
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
19
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
20
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमसाठी ‘टोइंग व्हॅन’ मंजूर

By admin | Updated: June 12, 2016 02:12 IST

कोलमडलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी होणार उपयोग.

वाशिम : शहरातील वाहतूक व्यवस्था पार कोलमडलेली आहे. भररस्त्यावर वाहनधारक आपली वाहने उभी करीत असल्याने नागरिकांना याचा त्रास होत असल्याचे वृत्त लोकमतने वारंवार प्रकाशित केल्याने याची पोलीस विभागाच्यावतीने दखल घेण्यात आली. शहर वाहतूक शाखेच्या मदतीसाठी टोइंग व्हॅन मंजूर करण्यात आली असून, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये ते शहरातून फिरणार आहे. यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणार्‍या वाहनांवर कारवाई अपेक्षित आहे. वाशिम शहरात रस्त्यावर वाहन उभे आढळून आल्यास टोइंग व्हॅनद्वारे ते उचलून नेण्यात येणार आहे. ते उचलून नेल्यानंतर वाहनधारकाला ते वाहन जेथे जमा आहे, तेथून मिळणार आहे. रस्त्याच्या मधोमध वाहन उभे केल्यानंतर शहर वाहतूक शाखेच्यावतीने १00 रुपये दंड आकारल्या जात होता. तो दंड आता १५0 रुपये वाहनधारकाला भरावा लागणार आहे. रस्त्यात वाहन उभे केले म्हणून १00 रुपये दंड व ५0 रुपये टोइंग व्हॅन खर्च, असे एकूण १५0 रुपयांचा भुर्दंंड वाहनधारकांना पडणार आहे. रस्त्यात उभे असलेल्या फेरीवाल्यांना सुद्धा दंड आकारण्यात येणार आहे. हातगाडी चालकांना ३00 रुपये दंड व मुंबई पोलीस कायदा १0२/११७ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी दिली. तसेच वाहनधारकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.