शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

मिटींगच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या तीन शाळा कुलूपबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 09:51 IST

विळेगाव, भिलडोंगर व गोवर्धन नगर येथील जिल्हा परिषद शाळा दुपारी ११.२० ते १२ या वेळेत कुलूपबंद आढळून आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.

- बबन देशमुख लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मिटींगच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या तीन शाळा कुलूपबंद असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने २१ आॅगस्ट रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये कैद झाला. मानोरा तालुक्यातील गिरोली केंद्रातील विळेगाव, भिलडोंगर व गोवर्धन नगर येथील जिल्हा परिषद शाळा दुपारी ११.२० ते १२ या वेळेत कुलूपबंद आढळून आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषद शाळांची स्थापना करण्यात आली आहे. काही शाळा यशाची एकेक पायरी गाठत आहेत तर काही शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या मात्र झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येते. मानोरा तालु्क्यातील काही दोन शिक्षकी शाळा मिटींगच्या दिवशी कुलूपबंद राहतात, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी २१ आॅगस्ट रोजी सकाळी ११.२० ते १२ वाजेदरम्यान गिरोली केंद्रातील भिलडोंगर, गोवर्धन नगर, विळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप आढळून आले. अधिक चौकशी केली असता, दोन शिक्षकी शाळा असल्याने आणि २१ आॅगस्ट रोजी दोन ठिकाणी मिटींग असल्याने दोन्ही शिक्षक त्या मिटींगला हजर राहण्याचे गेल्याचे सांगण्यात आले. एकाच दिवशी दोन मिटींगचे आयोजन करण्यामागे शिक्षण विभागाचा काय हेतू असावा याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. प्रभारी गटशिक्षणाधिकारी लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत माहिती घेऊन सांगतो असे सांगितले.

मिटींगच्या नावाखाली शाळा कुलूपबंद ठेवणे हा गंभीर प्रकार आहे. याची दखल घेतली असून, मानोरा गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून तातडीने अहवाल मागविण्यात आला. दोषींविरूद्ध निश्चित कारवाई केली जाईल.- दीपक कुमार मीना,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम

शाळेवर २ शिक्षक कार्यरत आहेत. २१ आॅगस्ट रोजी जगदंबा नगर येथे टॅग मिटिंग होती. त्यामुळे एक शिक्षक तेथे गेले तर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची सभा मानोरा येथे होती. त्या सभेला मी हजर होता.- अभिजीत लाड,मुख्याध्यापक जि.प. शाळागोवर्धन नगर ता. मानोरा

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराSchoolशाळा