शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून मायलेकीसह तीन ठार, चार जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2015 02:40 IST

परतीच्या पावसाची अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, तर वाशिम जिल्ह्यात दमदार हजेरी.

अकोला : परतीच्या पावसाने अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, तर वाशिम जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात वीज कोसळून मायलेकीसह तीन जण ठार, तर चार जण जखमी झाले. वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. रिसोड तालुक्यातील किनखेडा येथील राजेश पांडूरंग देशमुख यांच्या शेतात सोयाबिन काढणीचे काम सुरू झाल्याने, अचानक पावसाला सुरूवात झाल्याने, शेत मालक व पाच मजूर शेतातीलच झाडाखाली छत्री घेवून उभे होते. त्याचवेळी झाडावर वीज कोसळली. या झाडाखाली किनखेडा येथील संगीता राजेश देशमुख (वय ४५), रितेश राजेश देशमुख (वय १३), दुर्गा किसन अवचार (वय ५५) आणि पेडगाव येथील रूपाली मोहन अंभोरे (वय १२) व उज्वला मोहन अंभोरे (वय ४५), रचना राजू तुरूकमाने (वय ३0) हे सहा जण उभे होते. त्यापैकी उज्वला मोहन अंभोरे आणि त्यांची मुलगी रचना राजू तुरूकमाने यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले. सर्वांना रिसोड येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी दोघींना मृत घोषित केले. चार जखमींवर वाशिम येथे उपचार सुरू आहेत. रचना राजू तुरूकमाने ही मेहकर तालुक्यातील परतापूर येथील रहिवासी असून, ती पेडगाव येथे माहेरी आली होती. ती आईसोबत शेतात मजुरीला गेली असता, दोघींचाही वीज पडल्याने मृत्यू झाला. वीज कोसळून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथे दुपारी घडली. अडोळी येथील शेतकरी रामदास तुकाराम इढोळे (वय ४५) हे शेतात सोयाबिन काढणीचे काम करीत असताना, दुपारी ४ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतातील मजूर कुटाराच्या ढिगाजवळ जावून उभे राहीले, तर रामदास इढोळे यांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. त्याचवेळी वीज पडल्याने इढोळे यांचा मृत्यू झाला.