पोहरादेवी येथे आणखी तीन कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:40 AM2021-04-17T04:40:32+5:302021-04-17T04:40:32+5:30

००००० पाटणी चाैकात रस्ता दुभाजकाची मागणी वाशिम : नागरिकांच्या गर्दीने सदैव गजबजणाऱ्या शहरातील पाटणी चाैकातील मुख्य रस्त्यात लोखंडी बॅरिकेड्स ...

Three more corona patients at Pohardevi | पोहरादेवी येथे आणखी तीन कोरोना रुग्ण

पोहरादेवी येथे आणखी तीन कोरोना रुग्ण

googlenewsNext

०००००

पाटणी चाैकात रस्ता दुभाजकाची मागणी

वाशिम : नागरिकांच्या गर्दीने सदैव गजबजणाऱ्या शहरातील पाटणी चाैकातील मुख्य रस्त्यात लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. ते हटवून दुभाजक उभारण्यात यावे, अशी मागणी संदीप चिखलकर यांनी बांधकाम विभागाकडे शुक्रवारी केली.

०००००

केनवड परिसरात शेती मशागतीस सुरुवात

वाशिम : केनवड परिसरात शेतात नांगरणीसह इतर शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र, डिझेलच्या दरवाढीचा फटका सरळ शेतीच्या मशागतीस बसला असून, शेतकरी संतप्त झाला असून, ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

०००००

तोंडगाव येथे रुग्णसंख्येने वाढली चिता

वाशिम : तोंडगाव येथे आणखी दोन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे १६ एप्रिल रोजी निष्पन्न झाले. तोंडगाव येथे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.

००००

मेडशीत माकडांच्या कळपाचा धुडगूस

वाशिम : चारापाण्याच्या शोधात भटकत असलेल्या माकडांचा कळप मेडशीत धुडगूस घालून विविध पदार्थांचे नुकसान करीत आहे. त्यात ग्रामस्थांवर धावूनही जात असल्याने बालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

००००

रिठद येथे आरोग्य तपासणी मोहीम

वाशिम : रिसोड तालुक्यातील रिठद येथे आणखी चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल १६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा प्रयत्न म्हणून आरोग्य विभागाने शुक्रवारी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांची चाचणी केली जाणार आहे.

००००

जऊळका येथे विशेष मोहीम

वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या माध्यमातून उघड्यावर शाैचास जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे दिसून येत आहे.

००००

महामार्गावर गतिरोधकाची मागणी

वाशिम : वाशिम ते मंगरुळपीर या राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. शहरापासून जागमाथा मंदिरापर्यंत या रस्त्याला गतिरोधक नसल्याने अपघातांची शक्यता उद्भवली आहे. गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.

०००

वाशिम येथील उद्यानाचे काम ठप्प !

वाशिम : कोरोनामुळे वाशिम शहरातील नगर परिषद कार्यालयासमोर उद्यानाचे काम ठप्प पडले आहे. आता कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे उद्योनाचे काम पुन्हा लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर उद्यानाच्या कामाला गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

०००

पोलीस पाटलाचे पद रिक्त

वाशिम : मालेगाव तालुक्यातील ग्राम वरदरी बु. येथील पोलीस पाटील पद गत सहा वर्षांपासून रिक्त आहे. पोलीस पाटलाचे पदभरतीसाठी उमेदवाराच्या नावावर शेती असावी ही जाचक अट रद्द करावी आणि पोलीस पाटलाचे पद त्वरीत भरण्याची मागणी केली जात आहे.

०००

गुडमॉर्निंग पथक सक्रिय

वाशिम :रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा तालुक्यातील गावांमध्ये भेटी देत उघड्यावर शाैचास जाणाऱ्या लोकांचा शोध गुडमॉर्निंग पथकाच्यावतीने घेतला जात आहे. नागरिकांनी उघड्यावर शौचास जाऊ नये, असे आवाहन स्वच्छता विभागाने गुरुवारी केले.

Web Title: Three more corona patients at Pohardevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.