कारंजात होणार स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 06:05 PM2018-09-14T18:05:40+5:302018-09-14T18:06:21+5:30

कारंजा लाड (वाशिम) - ‘स्वच्छता ही सेवा’ या अंतर्गत कारंजा पंचायत समितीच्यावतीने १५ सप्टेंबरपासून स्वच्छतेचा जागर सुरू होणार आहे.  १५ सप्टेंबरला कार्यशाळा व त्यानंतर सायकल रॅली काढली जाणार आहे. 

there will be a cleanliness campaing in karanja | कारंजात होणार स्वच्छतेचा जागर

कारंजात होणार स्वच्छतेचा जागर

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) - ‘स्वच्छता ही सेवा’ या अंतर्गत कारंजा पंचायत समितीच्यावतीने १५ सप्टेंबरपासून स्वच्छतेचा जागर सुरू होणार आहे.  १५ सप्टेंबरला कार्यशाळा व त्यानंतर सायकल रॅली काढली जाणार आहे. 
या रॅलीदरम्यान चौकाचौकात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व काजळेश्वर येथील गुरूदेव भजनी मंडळाकडून पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा जागर करण्यात येईल. कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार मिना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्तापे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अहीरे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी कारंजा पंचायत समितीच्या सभापती वंदना मेटे, कारंजा पंचायत समिती गटविकास अधीकारी के. आर. तापी यांचेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाºयांची उपस्थिती राहील. या रॅली दरम्यान स्वच्छता ही सेवा या अंतर्गत स्वच्छता, पोषण अभियान, रूबेला लसीकरण, याबाबत जनजागृती केली जाणार आहे. कार्यशाळा व मोटारसायकल रॅलीत अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, बचतगटाच्या महिला तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाºयांची उपस्थिती राहणार असून, सर्वत्र स्वच्छतेचा गजर केला जाणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी के. आर. तापी यांनी दिली. दरम्यान, या रॅलीमध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाचे डॉ. दिलीप गावंडे सहभागी होऊन राष्ट्संत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांचे स्वच्छतेवरील भजनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत.

Web Title: there will be a cleanliness campaing in karanja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.