शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

गाडी आली, पळा.पळा!

By admin | Updated: December 18, 2015 02:32 IST

वाशिम जिल्हय़ात गुड मॉर्निंग पथक सक्रिय; उघड्यावर शौचास जाणा-यांची तारांबळ.

नंदकिशोर नारे / वाशिम: उघड्यावर शौचास बसल्याने होत असलेल्या आजारांची कल्पना असतानाही अनेक जण उघड्यावर शौचास बसताना दिसून येतात. यावर पायबंद घालण्यासाठी जिल्हय़ात गुड मॉर्निंंंग पथक सक्रिय करण्यात आले आहे. या पथकामुळे उघड्यावर शौचास जाणार्‍यांची भंबेरी उडाली असून, गाडी आल्याबरोबर विधी न उरकताच ह्यगाडी आली, पळा..पळाह्ण म्हणण्याची वेळ उघड्यावर शौचास जाणार्‍यांवर आली आहे. जिल्हय़ात गत तीन दिवसांपासून उघड्यावर शौचास जाणार्‍यांना प्रतिबंध करुन त्यांना शौचालयाचा वापर करण्यासंदर्भात जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्यावतिने स्वच्छता भारत मिशनचे एक पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक १५ डिसेंबर पासून जिल्हयातील प्रत्येक गावे पिंजुन उघडयावर शौचास जाणार्‍यांना पकडून त्यांना उघडयावर शौचास बसण्यापासून होणारे आजाराबाबत माहिती देत आहेत. पुन्हा त्या गावात असा प्रकार आढळून आल्यास त्यांचे नाव, पत्ता व ईतर माहिती घेवून त्यांना असा प्रकार पुन्हा घडल्यास दंडात्मक कारवाई केल्या जाणार असल्याच्या सूचना दिल्या जात आहेत. गत तीन दिवसात शेकडो शौचास पाणी नेणारे भांडे जप्त करण्यात आले आहे. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम १६, १७ (ग,घ) नुसार उघडयावर शौचास दंडनीय गुन्हा आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यन्वित करण्यात आलेल्या गुडमॉर्निंंंग पथकाने आतापर्यंंंत साखरा, भोयता, ईरळा, अमानी या गावांना भेटी देवून शेकडो जणांना पकडून उघडयावर शौचास न जाण्याच्या सूचना केल्यात. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या नेतृत्वात स्वच्छता भारत मिशनचे राजु सरतापे, राम ङ्म्रृंगारे, शंकर आंबेकर, प्रफुल काळे, रविचंद्र पडधान, संदिप ठोंबरे, विजय नागे, अभय तायडे, राऊत, महाले, सुखदेव पडघान, नागेश थोरात यांच्यावतिने गावागावात जावून जनजागृती केल्या जात आहे.