शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीचे सत्र सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST2021-09-12T04:47:42+5:302021-09-12T04:47:42+5:30

शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीच्या घटनेनंतर १० सप्टेंबरच्या रात्रीही ...

Theft session continues within the limits of Shirpur police station! | शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीचे सत्र सुरूच!

शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीचे सत्र सुरूच!

शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीच्या घटनेनंतर १० सप्टेंबरच्या रात्रीही चोरीच्या घटना घडल्या. ९ सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रिसोड तालुक्यामधील शेलगाव राजगुरे, तर मालेगाव तालुक्यातील दुधाळा व वसारी येथून प्रत्येकी एक अशा तीन मोटारसायकली चोरीला गेल्या. मसला पेनसह मध्यरात्री सात ठिकाणी चोऱ्या झाल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर पोलीस प्रशासन हरकत मध्ये येऊन चोरीच्या घटनेला लगाम लागेल, असे वाटत होते. मात्र, सप्टेंबरच्या रात्रीही शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीचे सत्र सुरूच होते. त्यात १० सप्टेंबर रोजी वसारी येथील माजी सरपंच लक्ष्मण जाधव यांच्या शेतातून १५ हजार रुपये किमतीच्या १९ स्प्रिंकलर तोट्या किंमत पंधरा हजार रुपये, प्रल्हाद जाधव यांच्या शेतातून १० हजार रुपये किमतीच्या १५ स्प्रिंकलर तोट्यांची चोरी झाली. रिसोड रस्त्यावर असलेल्या वसारी येथील राष्ट्रीय विद्यालयाचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. दुधाळा ते शेलगाव राजगुरे परिसरात चोरांनी चोरीच्या घटना घडवून आणल्या. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी पोलिसांत फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.

Web Title: Theft session continues within the limits of Shirpur police station!