शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलच्या सेवेत तांत्रिक बिघाड

By admin | Updated: June 15, 2014 01:13 IST

तब्बल १८ तास भ्रमणध्वनी, दूरध्वनी आणि ब्रॉडबँड सेवा खंडित झाली होती.

कारंजालाड : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्या सेवेत तांत्रिक बिघाड आल्याने तालुक्यातील तब्बल १८ तास भ्रमणध्वनी, दूरध्वनी आणि ब्रॉडबँड सेवा खंडित झाली होती. परिणामी बँकिंग व्यवहार ठप्प पडल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली. भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्या वतीने कारंजा ते मूर्तिजापूर मार्गावर भूमिगत केबल टाकण्यात आली आहे. यामधील मूर्तिजापूरपासून ११ कि.मी.पर्यंतच्या केबलमध्ये बिघाड आल्याने शुक्रवारी रात्री १0.१५ वाजतापासून या कंपनीची सेवा बंद पडली. परिणामी भ्रमणध्वनीधारक, दूरध्वनी आणि ब्राँडबँड सेवाधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. लँडलाईनची सेवा विस्कळीत झाल्याने तालुक्यातील २१00 ग्राहक आणि भ्रमणध्वनीच्या हजारो ग्राहकांचा जगाशी संपर्क तुटला होता. तसेच सातत्याने इंटरनेटद्वारे जगाशी कनेक्टेड राहणार्‍यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. तालुक्यात ४७0 ब्राँडबँडधारक आहेत. येथील राष्ट्रीयीकृत व मल्टिस्टेट बँकेने कोअर बँकिंग प्रणाली अवलंबविल्याने ब्राँडबँड सुविधा अत्यावश्यक झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे ब्राँडबँड सेवा प्रभावित झाल्याने बँकेचे व्यवहार ठप्प पडले. १४ जून रोजी शनिवार असल्याने बँकिंग व्यवहार अध्र्या दिवसापर्यंतच सुरू होते. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेत ग्राहकांनी गर्दी केली होती. पण बीएसएनएलची सेवा खंडित झाल्याने ग्राहकांना बाहेरगावी पैसे पाठविता आले नाही. परिणामी ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. उद्या रविवार सुटीचा दिवस आल्याने ग्राहकांची कामे थेट सोमवारवर ढकलल्या गेली आहे.