आधार संलग्ल खात्याअभावी बिजोत्पादकांचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 03:33 PM2018-12-02T15:33:42+5:302018-12-02T15:33:57+5:30

शेतकºयांचे आधार सलंग्न खाते क्रमांक मिळण्यास विलंब होत असल्याने खात्यात रक्कम जमा करणे कठीण झाले आहे.

subsidy stop due bank accounts is not available | आधार संलग्ल खात्याअभावी बिजोत्पादकांचे अनुदान रखडले

आधार संलग्ल खात्याअभावी बिजोत्पादकांचे अनुदान रखडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत हरभरा, मुग आणि उडदाचे उत्पादन करणाऱ्या शेतकºयांना गतवर्षी हमी दरापेक्षा कमी दर मिळाले. त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी हमीदर आणि प्रत्यक्ष विक्रीच्या दरातील फरकाची रक्कम देण्याची घोषणा शासवाने केली आहे; ही रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी शेतकºयांचे आधार सलंग्न खाते क्रमांक मिळण्यास विलंब होत असल्याने खात्यात रक्कम जमा करणे कठीण झाले आहे.
गतवर्षी महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत अकोला आणि वाशिमसह इतर जिल्ह्यातील शेकडो शेतकºयांनी हरभरा, मुग आणि उडिदाचे बियाणे उत्पादित करून महाबीजकडे विकले होते. गतवर्षी उडिदाचे हमीदर ५४०० रुपये असताना महाबीजकडून सरासरी ४८०० रुपये प्रति क्विंटल दराने शेतकºयांकडून खरेदी करण्यात आली, तर हरभºयाचे हमीदर ४४०० रुपये प्रति क्विंटल असताना महाबीजने ४०६० ते ४२०० रुपये प्रति क्विंटल दराने शेतकºयांकडून या बियाण्याची खरेदी केली. त्यामुळे बिजोत्पादक शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. याबाबत महाबीजकडे शेतकºयांकडून तक्रारीही करण्यात आल्यानंतर शासनाचे घोषीत हमीभाव हे विहित कालावधीतील बाजार समिती दरापेक्षा अधिक असल्यास यातील फरकाची रक्कम महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादीत (महाबीज), अकोला व राष्ट्रीय बीज निगम, पुणे यांच्यामार्फत बिजोत्पादक शेतकºयांना देण्याचे जाहीर करण्यात आले. आता या रकमेचे वितरण करण्यास मंजुरी मिळाली असून, शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे; परंतु बहुतांश शेतकºयांचे आधार संलग्न खात अप्राप्त असल्याने फरकाच्या रकमेचे अर्थात अनुदानाचे वितरण रखडले आहे.

महाबीजला बियाणे विकणाºया शेतकºयांपैकी ९० टक्के शेतकरी महाबीजसाठीच बिजोत्पादन करतात. तथापि, यातील काहींनी मधल्या काळात बिजोत्पादन केले नसेल. अशा खातेदारांचे आधार संलग्न खाते माहित करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडून ही माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने फरकाची रक्कम रखडली आहे.
-विनोद जावरकर
क्षेत्र अधिकारी
महाबीज वाशिम

Web Title: subsidy stop due bank accounts is not available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.