शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST

मालेगांव :- शहरातील विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या सदस्यांनी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मालेगाव शहरात विघ्नहर्ता फाउंडेशनमार्फत गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका ...

मालेगांव :- शहरातील विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या सदस्यांनी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मालेगाव शहरात विघ्नहर्ता फाउंडेशनमार्फत गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका सुरू केली आहे. शहरातील हा पहिलाच प्रयोग असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

मालेगाव शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे; मात्र परिसरातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी निवांत अशी जागा मिळत नव्हती. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन शहरातील गांधी चौक येथील विघनहर्ता कॉम्प्लेक्समध्ये विघ्नहर्ता फाऊंडेशनने एकाच वेळेस पन्नास विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करू शकतील असा सुसज्ज हॉल तयार केला असून, त्यामध्ये मोफत पुस्तकेसुद्धा विद्यार्थ्यांना पुरविली आहे. या अभ्यासिकेचे उद्घाटन मालेगाव तहसीलदार रवी काळे यांनी केले. प्रमुख उपस्थिती म्हणून जि. प. सदस्य श्याम बडे, प्रमुख उपस्थिती नगरसेवक संतोष जोशी, प्रा. जिया, संतोष तिखे, अरुण बळी, आदी मान्यवर होते. तहसीलदार काळे यांनी अभ्यासिकेचे महत्त्व विशद करून ही एक संधी आहे, याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले. शिवाजी बळी यांनी प्रास्ताविक केले, नवीन अवचार यांनी सूत्रसंचलान केले, तर पंकज भुतेकर यांनी आभार मानले.

100921\img-20210910-wa0046.jpg

काळे साहेब