लोकवर्गणीतून साकारली अभ्यासिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 03:26 PM2019-11-03T15:26:16+5:302019-11-03T15:26:31+5:30

मार्च २०१७ पासून सुरू असलेल्या या अभ्यासीका खोलीला वसंत कलाम असे नाव देण्यात आले आहे.

Study house done by people! | लोकवर्गणीतून साकारली अभ्यासिका!

लोकवर्गणीतून साकारली अभ्यासिका!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा, यासाठी मानोरा येथे नगर पंचायतच्या इमारतीमध्ये काही होतकरू युवकांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून अभ्यासीका सुरू केली. त्याठिकाणी दैनंदिन अभ्यास करायला येऊन ग्रामीण भागातील युवकांकडून आयएस, आयपीएस होण्याची धडपड केली जात असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.
नगर पंचायत कार्यालयाच्या बाजूलाच दोन खोल्यांची एक इमारत अडगळीत पडून होती. या खोलीचे दरवाजे, खिडक्याही तुटल्या होत्या. अशा बिकट अवस्थेतील खोलीला एका चांगल्या कामासाठी उपयोगात आणण्याची संकल्पना तत्कालीन मुख्याधिकारी अमोल माळकर यांना सूचली. ती त्यांनी प्रत्यक्षात अंमलात आणत नगर परिषद उपाध्यक्ष अमोल राऊत यांच्या मदतीने इमारतीची स्वच्छता करून घेतली. सोबतच लोकवर्गणीतून पैसे जमवून खोलीची दुरूस्ती करण्यासह नवीन दरवाजे, खिडक्या बसविल्या. खुर्ची आणि टेबल आणून या खोलीत अभ्यासीका सुरू केली. होतकरू विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन काही वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके, उपलब्ध करून दिली. मार्च २०१७ पासून सुरू असलेल्या या अभ्यासीका खोलीला वसंत कलाम असे नाव देण्यात आले आहे.
 
३५ विद्यार्थी करतात दैनंदिन स्पर्धा परीक्षेचा सराव

रणजीत जाधव, अमोल राऊ त, अमोल माळकर, शिवरतन पांडिया आदिंनी अभ्यासिका सुरू होण्यासाठी अर्थसहाय्य दिले आहे. येथे दररोज ३० ते ३५ विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा सराव करतात. ज्यांना अभ्यास करायला जागा नाही, पुरेशा सुविधा नाहीत, अशी मुले येथे दररोज सकाळी ९ ते रात्री ८ वाजतापर्यंत पुस्तकात डोके घालून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. येथे अभ्यास करणारे तीन युवक स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन विविध पदावर कार्यरत आहेत. प्रज्वल पदमगीरवार नामक युवक येथे ‘केअर टेकर’ म्हणून काम करतो.

 

Web Title: Study house done by people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.