विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून दिला मतदान करण्याचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:20 IST2019-10-07T14:19:46+5:302019-10-07T14:20:01+5:30
मालेगाव येथील बाल शिवाजी विद्यालयाने ‘मतदान करा’ हा संदेश मानवी साखळीतून रेखाटला व मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे.

विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून दिला मतदान करण्याचा संदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली 'स्वीप' कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये शिक्षण विभागामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.
मालेगाव येथील बाल शिवाजी विद्यालयाने ‘मतदान करा’ हा संदेश मानवी साखळीतून रेखाटला व मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे. यामध्ये विद्यालयाचे १८० विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच नाना मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनीही अशाच संदेश रेखाटला. वाशिम येथील सौ. सुशीलाताई जाधव विद्या निकेतन शाळेमध्ये २३० विद्यार्थी व १० शिक्षकांनी मानवी साखळीतून ह्यमतदान कराह्ण हा संदेश तसेच ईव्हीएमच्या आकारातील लोगो बनवून मतदार जागृती केली आहे. शिक्षण विभागामार्फत आतापर्यंत चित्रकला, रांगोळी, घोषवाक्य स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर प्रभात फेरीद्वारेही मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.
(प्रतिनिधी)