मालेगाव येथील किराणा दुकानात चोरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:14 IST2017-08-10T01:14:16+5:302017-08-10T01:14:37+5:30
मालेगाव: अज्ञात चोरट्यांनी बुधवार, ९ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास शहरातील मेडिकल चौक परिसरातील महेश किराणा दुकान फोडून ३0 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना सकाळी ८ वाजता दुकान मालकाच्या लक्षात आली. याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मालेगाव येथील किराणा दुकानात चोरी!
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: अज्ञात चोरट्यांनी बुधवार, ९ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास शहरातील मेडिकल चौक परिसरातील महेश किराणा दुकान फोडून ३0 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना सकाळी ८ वाजता दुकान मालकाच्या लक्षात आली. याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत महेश द्वारकादास भुतडा यांनी मालेगाव पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की ९ ऑगस्ट रोजी सकाळी दुकान उघडण्यास गेलो असता दुकान उघडल्यानंतर मागील बाजूच्या टीनपत्र्यांखालील भागात खड्डा पडलेला आणि पत्र्याचा खालचा भाग काढलेला दिसला. त्यानंतर दुकानात पाहणी केली असता रोख २0 हजार रुपये व प्रत्येकी ५ किलो काजू व बादाम, तसेच १0 हजार रुपयांची कॉफीची पाकिटे, असा एकंदरित ३0 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून मालेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविचे कलम ४६१, ३८0 नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास मनोहर आष्टुनकर करीत आहेत.