शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अतिरिक्त सीईओ, प्रकल्प संचालकांची २८ पदं रिक्त!

By admin | Updated: October 14, 2014 00:32 IST

मंत्रालयातील उपसचिवांना मागितले पर्याय.

अकोला- जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी आणि प्रकल्प संचालकांची राज्यात एकूण २८ पदं रिक्त आहेत. त्यामुळे या यंत्रणांचा कारभार प्रभावित झाला असून, ग्राम विकासाच्या दृष्टीने या दोन्ही पदांचे महत्त्व लक्षात घेता मंत्रालयातील उ पसचिवांमधून ही पदं भरण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यादृष्टीकोणातून उपसचिवांना पर्याय मागितले असले, तरी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता ही पदं भरण्याची प्रक्रिया नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच पूर्ण केली जाणार आहे. जिल्हा परिषदेतील सहा महत्त्वाची खाती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे असतात. याच पदाला समकक्ष असलेल्या प्रकल्प संचालकांकडे केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकासाशी संबंधित प्रमुख योजना, बचत गटांची कामे, घरकुल योजनांसारखी कामे असतात. कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली ही २८ पदं सध्या रिक्त आहेत. प्रभारींकडून या पदांचा कारभार बघितला जात आहे. त्याचा परिणाम निर्णय क्षमतेवर होऊन अनेक महत्त्वाची कामं रखडली आहे. प्रभारी अधिकार्‍यांकडून त्यांच्या मूळ पदांच्या कामांना प्राधान्य दिले जाते. त्यातून सवड मिळाली तर प्रभारी पदाचा कारभार ते पाहतात. त्यामुळे ही सर्व पदं भरण्याच्या दृष्टीने मंत्रालयात उपसचिव पदावर कार्यरत अधिकार्‍यांना सप्टेंबर महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी पर्याय मागण्यात आले होते. उपसचिव हे पद अतिरिक्त सीईओ व प्रकल्प संचालकांशी समकक्ष असल्यामुळे शासनाने उ पसचिवांमधून रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला होता. या प्रक्रियेला विधानसभा निवडणुकीमुळे खिळ बसली असल्याने आजही ही पदं रिक्तच आहेत. *अतिरिक्त सीईओंची पदं रिक्त असलेले जिल्हे सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, बीड, अमरावती, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, पालघर. *प्रकल्प संचालक पद रिक्त असलेले जिल्हे अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया,चंद्रपूर, गडचिरोली, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड.