मुंगळा येथे शिवजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:17 IST2021-02-21T05:17:22+5:302021-02-21T05:17:22+5:30

मुंगळा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत विकास तहकीक, जिजामातेच्या वेशभूषेत साक्षी पवार यांनी ...

Shiva Jayanti celebrations at Mungala | मुंगळा येथे शिवजयंती उत्साहात

मुंगळा येथे शिवजयंती उत्साहात

मुंगळा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत विकास तहकीक, जिजामातेच्या वेशभूषेत साक्षी पवार यांनी भूमिका साकारली होती. मावळ्यांच्या वेशभूषेत मंगेश मुळे, ओम काकडे होते. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे वर्धमान काटकर व मधुकर तहकीक यांच्या हस्ते विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान, मुंगसाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नंदू तहकीक, हरी बोबडे, देवा बोबडे उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मावळत्या सरपंच सिंदूबाई पवार, उपसरपंच गजानन केळे, माजी सरपंच डॉ. डिगांबर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील परिसरातील दैनंदिन स्वच्छता करणाऱ्या वृद्ध महिला गंगूबाई तहकीक यांचा सरपंच सिंधूबाई पवार यांच्या हस्ते साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला.

Web Title: Shiva Jayanti celebrations at Mungala