'She' committed suicide just because a young man was molested her | युवकाने छेड काढल्यानेच ‘तिने’ केली आत्महत्या!
युवकाने छेड काढल्यानेच ‘तिने’ केली आत्महत्या!


लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : आरोपी युवकाने हात धरून, पाठलाग करून छेडछाड केली. त्याच्या त्रासाला कंटाळूनच माझी बहिण अर्चना श्रीपत ढंगारे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार मृतक मुलीच्या बहिणीने मालेगाव पोलिसांत सोमवार, १६ सप्टेंबर रोजी दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी युवक आकाश श्रीराम पवार याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मालेगाव तालुक्यातील देवठाणा खांब येथील १९ वर्षीय युवती अर्चना ढंगारे हिने १८ आॅगस्ट २०१९ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली होती. दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी मृतक मुलीच्या बहिणीने पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की अर्चना ही ५ आॅगस्ट २०१९ रोजी गावातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता, आकाश श्रीराम पवार याने तिचा हात धरून छेडछाड केली. त्यावेळी अर्चनाने संतप्त होत पायातील चप्पल काढून त्याच्या तोंडावर मारली. त्यावेळी आरोपी तिथून निघून गेला. १८ आॅगस्ट २०१९ रोजी अर्चना कॉलेजला जात असताना आरोपी आकाश पवार याने तिचा पाठलाग करून तिची पुन्हा छेड काढली. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर तीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी आकाश पवार याच्यावर भादंविचे कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास मालेगाव पोलिस करित आहे.

Web Title: 'She' committed suicide just because a young man was molested her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.