शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

मुदतीनंतरही सातबारा पुनर्शोधन अपूर्ण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 20:29 IST

वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमिअभिलेख आधुनिकीकरण प्रक्रि येत वाशिम जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी, १५ आॅगस्टच्या निर्धारित मुदतीपर्यंत जिल्हा प्रशासनाला काम पूर्ण करता आले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ८०९ पैकी ७५० गावातील साताबारा पुनर्शोधन पूर्ण झाले आहे, तर ५३० गावांचे अंतिम प्रमाणपत्रही तयार झाले आहे.  

ठळक मुद्देप्रशासनाचे प्रयत्न जिल्ह्यातील ७० टक्के काम पूर्ण 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमिअभिलेख आधुनिकीकरण प्रक्रि येत वाशिम जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी, १५ आॅगस्टच्या निर्धारित मुदतीपर्यंत जिल्हा प्रशासनाला काम पूर्ण करता आले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ८०९ पैकी ७५० गावातील साताबारा पुनर्शोधन पूर्ण झाले आहे, तर ५३० गावांचे अंतिम प्रमाणपत्रही तयार झाले आहे.  शासनाने संगणकीकरणावर भर दिल्यानंतर सर्वच दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या सात-बाराचेही संगणकीकरण करण्यात  आले. शेतकºयांना अद्ययावत सातबारा मिळावा, गट क्रमांकामधील क्षेत्रांसंदर्भात असलेले आक्षेप दूर व्हावे या उद्देशाने सातबारा संगणकीकरण प्रक्रिया राज्यभरात झ्रपाट्याने पूर्ण करण्यात आली; परंतु त्यामध्येही अनेक त्रुटी आढळून आल्यानंतर शासनाने सातबार री-एडिट कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. या अंतर्गत सुरुवातीला महसूल मंडळ स्तरावर सातबारा चावडी वाचन प्रक्रिया राबवून त्यामध्ये क्षत्र न जुळत असलेल्या गटक्रमांकासह, इतर तांत्रिक अडचणींबाबत शेतकºयांचे आक्षेप नोंदवून घेण्यात आले. ही प्रकिया १५ जुलैपूर्वीच पूर्ण करण्यात आली. त्यानंतर शेतकºयांच्या आक्षेपानुसार आणि लेखी सातबाराचे निरीक्षण करून तहसील स्तरावर दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरावर उर्वरित दुरुस्तीचे काम करून पुन्हा सातबारा री-एडिट प्रक्रिया राबविण्यास सुरूवात करण्यात आली. यासाठी शासनाकडून १५ आॅगस्टची मुदत देण्यात आली होती. तथापि, १९ आॅगस्टपर्यंत वाशिम जिल्ह्यातील ८०९ गावांपैकी ७५० गावांतील सातबारा पुनर्शोधन पूर्ण झाले असून, ५३० गावांचे अंतिम प्रमाणपत्र तयार झाले आहे. दरम्यान, काम पूर्ण झाले नसले तरी, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे राज्याच्या महसूल व वनविभागाच्यावतीने वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी सागर हवालदार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.