शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

रिसोड : युती व आघाडीला झटका; बंडखोर उतरले रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 2:18 PM

या मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांनी अर्ज भरल्याने निवडणुकीत रंगत येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार अनंतराव देशमुख आणि भाजपाचे माजी आमदार विजयराव जाधव या दोघांनाही रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने निवडणुकीमध्ये रंगत आली असून ईतर राजकीय पक्षाच्या उमेदवारांसमोर अडचणी निर्माण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.रिसोड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे मातब्बर व जेष्ठ नेते म्हणून अनंतरावांना ओळखल्या जाते. तसेच माजी आमदार विजयराव जाधव यांचेही मतदारसंघामध्ये चांगले वलय आहे. या दोन्ही नेत्यांना प्रमुख पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने दुसऱ्या पक्षाच्या शोधात होते. परंतु त्यातही अपयश आल्याने अर्ज भरण्याच्या शेवटच्यादिवशी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. या दोन्ही नेत्यांनी अर्ज दाखल केल्याने ईतर उमेदवारांसमोरच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनंतराव देशमुखांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस तर विजयराव जाधव यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे उमेदवारांना आपले मतदार सांभाळण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. त्यात वंचित आघाडीच्या उमेदवाराने सुध्दा प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. या मतदारसंघामध्ये बहुरंगी अशी लढतीचे चित्र सद्यस्थितीत दिसून येत आहे. निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांजवळ आपआपले काही गठ्ठा मतदान असल्याची चर्चा असून ईतर काही मतदारांच्या सहाय्याने आपला विजय होवू शकतो त्यामुळे सर्वच जण नशिब आजमावतांना दिसून येत आहेत. रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीत काही उमेदवार केवळ पाडापाडीचे राजकारण करण्यासाठी उभे राहले असल्याची चर्चा होत आहे. या मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांनी अर्ज भरल्याने निवडणुकीत रंगत येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. मतदारसंघातील प्रमुख उमेदवाररिसोड विधानसभा मतदारसंघ आघाडीत काँग्रेसला तर महायुतीत शिवसेनेसाठी सुटला आहे. काँग्रेसकडून आमदार अमित झनक तर शिवसेनेकडून विश्वनाथ सानप निवडणूक लढवित आहेत. तर वंचित आघाडीकडून दिलीपराव जाधव, मनसेकडून डॉ. विजय उल्लेमाले यांचा समावेश आहे. पक्षाने तिकीट न दिल्याने व दुसºया पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करुन अपयश आलेल्या काँंग्रेसचे जेष्ठ नेते अनंतराव देशमुख व भाजपाचे नेते विजयराव जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

टॅग्स :washimवाशिमrisod-acरिसोडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019