शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर तालुक्याचा निकाल ९१.३७ टक्के!

By admin | Updated: May 31, 2017 02:07 IST

मंगरुळपीर : १२ वी परिक्षेचा निकाल आज रोजी घोषीत झाला असून यामध्ये मंगरुळपीर तालुक्याचा ९१.३७ टक्के एवढा निकाल लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाव्दारे फेब्रुवारी मार्च मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परिक्षेचा निकाल आज रोजी घोषीत झाला असून यामध्ये मंगरुळपीर तालुक्याचा ९१.३७ टक्के एवढा निकाल लागला आहे. तालुक्यात एकुण २३९१ विदयार्थ्यांनी फार्म भरले होते. त्यापैकी २३८९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामधून २१८३ विदयार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९१.३७ अशी आहे. मागील वर्षी तालुक्याचा निकाल ८७.६१ टक्के होता. त्यामध्ये यंदा ३.७६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तालुक्यातील एकूण १९ कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान कला, वाणिज्य व एमसीव्हीसी व व्होकेशनल शाखेतील एकूण २३८९ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती त्यापैकी २१८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रविण्यश्रेणीत ५७, ‘अ’ श्रेणीमध्ये ७६५ तर ‘ब’ श्रेणीमध्ये १२०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील १९ कनिष्ठ महाविद्यालयापैकी १८ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ७६ टक्केच्या वर लागला असून मातोश्री पार्वताबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ६५.३८ एवढा लागला आहे. सर्व शाखेतून सर्वात जास्त निकाल लागण्याचा मान लक्ष्मीचंद क. महाविद्यालय, शेलूबाजारला मिळाला असून त्यांचा निकाल ९९.५५ टक्के एवढा लागला आहे तालुक्यातील ८ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयांपैकी लक्ष्मीचंद क.म. शेलूबाजार, एम.सी.ठाकरे क. महाविद्यालय कासोळा व यशवंतराव चव्हाण क. महाविद्यालय मंगरुळपीर या तीन महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला असून उर्वरीत पाच कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल सुद्धा ९० टक्केचा वर लागला आहे वाणिज्य शाखेतून वसंतराव नाईक क.म. मंगरुळपीर व लक्ष्मीचंद क. महाविद्याय शेलूबाजार या दोन कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० टक्के एवढा निकाल लागला आहे. तालुक्यातील विज्ञान कला व वाणिज्य शाखेतील क.म.चा एकत्रीत निकाल पुढील प्रमाणे आहे. सुधाकर नाईक क.म. मंगरुळपीर ८०.१५ टक्के, जि.प.क.म.मंगरुळपीर ९७.५९ वसंतराव नाईक क.म. मंगरुळपीर ९०.४७ टक्के, शिवाजी क.म. वनोजा ९३.१८ टक्के, कलंदरीया उर्दु क़म. मंगरूळपीर ९०.१६ टक्के, धानोरकर भादर्श क़म. धानोरा खुर्द ९४.५३ टक्के,लक्षमीचंद क.म. शेलूबाजार ९९.५५ टक्के, ब्रम्हानंदगिरी क.म.मोहरी ७६.१९ टक्के, श्रीमती साळुंकाबाई राउत क.म. वनोजा ७९ टक्के, भगवंतराव महाकाळ क.म. मानोरा९०.५८ टक्के, जनता क.म. कवठळ ९०.९० टक्के, एम.सि.ठाकरे क.म. कासोळा ९०.०४ टक्के, अविनाश क.म. मंगरुळपीर ८० टक्के, एन.बी.शेळके क.म.कुंभी ८७.१५ टक्के, यशवंतराव चव्हाण क.म. मंगरुळपीर ९८.८५ टक्के, मुरलीधर इंगोले क.म. कंझरा ९७.१४ टक्के, मातोश्री पार्वतीबाई महाविद्यालय मंगरुळपीर ६५.३८ टक्के, मौलाना अ.कलाम उर्दु क.म. आसेगाव ९२ टक्के, मधुकरराव सपकाळ क.म. पिंप्री बु ९१.६६ टक्के, तालुक्यातील व्होकेशनल विषयाचा क.महाविद्यालयाचा निकाल पुढील प्रमाणे धानोरकर आदर्श क.म. धोनारा खुर्द ९६.७२ टक्के,लक्ष्मीचंद क.म. शेलूबाजार ९६.२९ टक्के, श्रीमती साळूंकाबाई राउत क.म. वनोजा ९१.४८ टक्के, भगवंतराव महाकाळ क.म. मानोली ९५.९४, श्री एम.सी. ठाकरे क.म. कासोळा ८२.१५, आज रोजी लागलेल्या निकालामध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांचे गुरुजनवर्ग, आई वडील, चाहते मित्र परिवार व नातेवाईकाकडून अभिनंदन करण्यात आले.