शिवसेना उबाठा पक्षात फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी दुसऱ्यांदा मापारी
By संतोष वानखडे | Updated: February 29, 2024 15:03 IST2024-02-29T15:00:52+5:302024-02-29T15:03:32+5:30
दोन वर्षांपूर्वी राज्यात शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर निष्ठावंतांकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवित पक्ष बांधणीला ठाकरे गटाने प्राधान्य दिले होते

शिवसेना उबाठा पक्षात फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी दुसऱ्यांदा मापारी
संतोष वानखडे
वाशिम : साधारणत: १३ महिन्यांत जिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दोनदा फेरबदल झाले असून, जिल्हा प्रमुखपदी सुरेश मापारी यांची दुसऱ्यांदा वर्णी लागली तर मावळते जिल्हा प्रमुख डाॅ. सुधीर कवर यांच्याकडे वाशिम जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
दोन वर्षांपूर्वी राज्यात शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर निष्ठावंतांकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवित पक्ष बांधणीला ठाकरे गटाने प्राधान्य दिले होते. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने २८ जानेवारी २०२३ रोजी शिवसेनेचे वाशिम जिल्हा प्रमुखपदी डाॅ. सुधीर कवर तर तत्कालिन जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्याकडे जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी सोपविली होती. १३ महिन्यानंतर पुन्हा पक्ष संघटनेत फेरबदल झाले असून, जिल्हा प्रमुखपदी सुरेश मापारी, जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी डाॅ. सुधीर कवर तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ संघटकपदी कॅप्टन प्रशांत सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली. डाॅ. सुधीर कवर यांनी यापूर्वी जवळपास १२ वर्षे तर सुरेश मापारी यांनी जवळपास ६ वर्षे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली होती.