शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

हमीभावाने तूर विक्रीसाठी ३० हजार शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 14:46 IST

मालेगाव, वाशिम, रिसोड आणि मानोरा या ठिकाणी हमीभावाने तूर खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी भर दिला आहे. या अंतर्गत गुरुवार २६ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील सहाही शासकीय खरेदी केंद्रावर मिळून ३० हजार ७११ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. तथापि, काही खरेदी केंद्रावर मोजणी संथगतीने होत असल्याने शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, नोंदणीसाठी १५ मार्चपर्यंतची मुदत आहे.जिल्ह्यात जिल्हा पणन अधिकारी कार्यालयांतर्गत नाफेडसाठी मालेगाव, वाशिम, रिसोड आणि मानोरा या ठिकाणी हमीभावाने तूर खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आले आहेत, तर विदर्भ कोआॅपरेटिव्ह मार्केटिंग सोसायबटी (व्हीसीएमएस) अंतर्गत कारंजा आणि मंगरुळपीर येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. या सहाही केंद्रावर मिळून २६ फेबु्रवारीपर्यंत ३० हजार ७११ शेतकºयांची तूर खरेदी करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. त्यात जिल्हा पणन अधिकारी कार्यालयांतर्गत मालेगाव येथील २४००, वाशिम येथील ८२११, मानोरा येथील ३९५०, तर रिसोड येथील २८९४ शेतकºयांचा समावेश आहे. त्याशिवाय व्हीसीएमएस अंतर्गत मंगरुळपीर येथे ७०२९ आणि कारंजा येथील ६२२७ शेतकºयांचा समावेश आहे.गत महिनाभरापासून नोंदणी प्रक्रिया सुरू असताना आणि आठवडाभरापूर्वी खरेदी सुरू झाली असताना आजवर केवळ ६९८ शेतकºयांकडील ६५८३.९० क्विंटल तुरीची खरेदी होऊ शकली आहे. त्यात सर्वाधिक ५१८ क्विंटल खरेदी ही वाशिम येथील केंद्रावर झाली आहे. त्याशिवाय मालेगाव येथे ८३, मानोरा येथे ६६ शेतकºयांच्या तुरीची खरेदी झाली आहे. व्हीसीएमएस अंतर्गत सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेत कारंजा येथे २३, तर मंगरुळपीर येथे केवळ ८ शेतकºयांच्या तुरीची मोजणी झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रिसोड येथे तूर खरेदीला अद्याप प्रारंभच नाहीशासकीय खरेदी प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील रिसोड येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु अद्यापही येथील केंद्रावर शेतकºयांच्या तूर खरेदीला प्रारंभ झालेला नाही. या केंद्रावर २६ फेबु्रवारीपर्यंत तूर विक्रीसाठी नोंदणी करणाºया २८९४ शेतकºयांना खरेदीची प्रतिक्षा आहे.

वाशिम जिल्ह्यात नाफेड अंतर्गत सुरू असलेल्या तूर खरेदीतील तूर साठविण्यासाठी गोदामांची तजबीज झालेली नव्हती. त्यामुळे खरेदी संथगतीने सुरू होती. आता ही समस्या मिटली आहे. रिसोड येथील खरेदी प्रक्रियाही येत्या एक दोन दिवसांत सुरू होईल.- एच. एल. पवारजिल्हा पणन अधिकारी,अकोला, वाशिम

आमच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करणाºया शेतकºयांना तूर खरेदीसाठी रितसर ‘एसएमएस’ पाठविले जात आहेत. शेतकºयांनी तूर केंद्रावर आणल्यानंतर लगेच मोजणी करण्यात येते. कोणत्याही शेतकºयाला थांबवून ठेवले जात नाही.- गोपाल हेडासंचालक , रामदेव कृषीबाजार खासगी, मानोरा

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी