निर्बंधाला पुन्हा मुदतवाढ; सायंकाळी ४ पर्यंतच खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 12:07 PM2021-07-12T12:07:35+5:302021-07-12T12:07:42+5:30

Washim News : सायंकाळी ४ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहणार आहेत.

Re-extension of restrictions; Shopping until 4 p.m. | निर्बंधाला पुन्हा मुदतवाढ; सायंकाळी ४ पर्यंतच खरेदी

निर्बंधाला पुन्हा मुदतवाढ; सायंकाळी ४ पर्यंतच खरेदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : डेल्टा प्लस व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्याचा समावेश अनलॉकच्या तिसऱ्या स्तरात झाल्याने २८ जून ते १२ जुलै या दरम्यान निर्बंध लागू करण्यात आले. या निर्बंधांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने यापुढेही सायंकाळी ४ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहणार आहेत. शनिवार व रविवारी केवळ अत्यावशक वस्तू व सेवांची दुकाने सुरु राहतील तर इतर सर्व दुकाने पूर्णत: बंद राहतील.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तिसºया स्तरातील निर्बंध जिल्ह्यात लागू आहेत. १२ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत निर्बंधाला मुदतवाढ देण्यात आली असून, यापूर्वीच्या नियमावलीत कोणताही बदल नाही. या आदेशानुसार अत्यावश्यक वस्तू व सेवांसह इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. मात्र, शनिवारी व रविवारी केवळ अत्यावशक वस्तू व सेवांची दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील व इतर सर्व दुकाने पूर्णत: बंद राहतील. शनिवारी व रविवारी केवळ पार्सल व होम डिलिव्हरी सुविधा सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर दररोज सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. याठिकाणी ए. सी.चा वापर करण्यास मनाई राहील. सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे, मॉर्निंग वॉक व सायकलिंगला सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. बाहेर मोकळ्या जागेत सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत व सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत क्रीडा विषयक बाबींना मुभा राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार यांची राहणार आहे.

५० टक्के कर्मचारी उपस्थिती
खाजगी बँक, विमा, औषधी कंपनी, सूक्ष्म वित्त संस्था व गैर बँकिग वित्तीय संस्था यांची कार्यालये नियमितपणे सुरु राहू शकतील. कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्थापना, कृषि, बँक, मान्सूनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.  दुय्यम निबंधक कार्यालय, एलआयसी, एमएसआरटीसी आदी शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील. उर्वरित सर्व शासकीय कार्यालये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील.


जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंधांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. निर्बंधाचे पालन करून जिल्हावासियांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: Re-extension of restrictions; Shopping until 4 p.m.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.