शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘जनसुविधा, तिर्थक्षेत्र विकास’चे प्रस्ताव रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 14:04 IST

मालेगाव येथे कायमस्वरुपी गटविकास अधिकारी नसल्याने विकासात्मक कामांना खीळ बसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव पंचायत समितींतर्गतचे जनसुविधा, तिर्थक्षेत्र विकास, दलित वस्ती, रोपवाटीकेचे प्रस्ताव रखडल्याने ग्राम पंचायतींमधून नाराजीचा सूर उमटला आहे. गत तीन वर्षांपासून मालेगाव येथे कायमस्वरुपी गटविकास अधिकारी नसल्याने विकासात्मक कामांना खीळ बसत आहे.मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाच्या संगीत खुर्चीचा खेळ अद्याप संपलेला नाही. गेल्या वर्षभरात ३ गटविकास अधिकारी बदलले असून अद्याप कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळाले नाहीत. एक वर्षीपूर्वी संदीप कोटकर यांच्याकडे प्रभार होता. त्यानंतर कायमस्वरूपी गटविकास अधिकारी म्हणून कुलदीप कांबळे रूजू झाले. परंतू, अल्पावधीतच त्यांची बदली झाली. त्यानंतर दोन ते तीन अधिकाऱ्यांकडे प्रभार देण्यात आला. एका महिन्यात तीन अधिकाऱ्यांकडे प्रभार सोपविण्यात आल्यानंतरही कुणी उत्सकुतेने प्रभार घेतला नाही. आता जिल्हा परिषद स्वच्छता मिशन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्याकडे मालेगाव गटविकास अधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. वाशिम येथील स्वच्छता मिशन विभागाचा नियमित कारभार पाहून इस्कापे यांना मालेगाव येथील पंचायत समितीचा प्रभारही पाहावा लागत आहे. वाशिम येथून अप-डाऊन असल्याने पंचायत समितीच्या अन्य अधिकारी, कर्मचाºयांवर फारसा वचक बसत नाही. याचा विपरित परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत असून, जनसुविधा, दलित वस्ती, तांडा वस्ती, तिर्थक्षेत्र विकास, रोपवाटिका आदींचे प्रस्ताव रखडले आहेत. विविध योजनेंतर्गतच्या सिंचन विहिर, ग्रामीण भागातील घरकुल, शौचालय आदी कामेही रेंंगाळत आहेत. विकासात्मक कामांना चालना मिळावी याकरीता मालेगाव येथे कायमस्वरुपी गटविकास अधिकारी मिळणे आवश्यक ठरत आहे.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिम