शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवासाला पसंती; आरक्षण मिळविण्यासाठी धडपड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:46 IST

वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवासाला प्रवाशांची पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीसाठी ...

वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवासाला प्रवाशांची पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीसाठी आतापासूनच आरक्षण मिळावे यासाठी प्रवाशांची धडपडही सुरू झाली आहे. वाशिममार्गे सध्या ८ रेल्वे धावत आहेत. रेल्वे प्रवासाला पसंती मिळत असली तरी कोरोनाविषयक नियमांचे पालन योग्य पद्धतीने होत नसल्याचे दिसून येत आहे.

०००००

लांब पल्ल्याच्या आरक्षणाला प्राधान्य

सणासुदीच्या काळात तसेच आगामी दिवाळीदरम्यान ऐनवेळी गैरसोय होऊ नये म्हणून तिरुपती, नागपूर, जयपूर, सिकंदराबाद यासह अन्य लांब पल्ल्याच्या ठिकाणांचे आरक्षण काढण्याला प्रवाशांचे प्राधान्य असल्याचे दिसून येते. तूर्तास तरी लांब पल्ल्याच्या आरक्षण मिळत नाही, अशी परिस्थिती वाशिम येथे दिसून येत नाही.

०००००००

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

तिरुपती-अमरावती

नरखेड-काचीगुडा

जम्मुतावी-नांदेड

हैदराबाद-जयपूर

सिकंदराबाद-जयपूर

अमरावती-तिरुपती

००००००००००००००

सिकंदराबाद मार्गावर गर्दी कमी

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने व्यापार व उद्योगव्यवसाय सुरू झाल्यामुळे व सणासुदीच्या काळात नागरिकांची बाहेरगावी जाण्यासाठी गर्दी वाढली आहे. परंतु त्या तुलनेत सिकंदराबाद मार्गावर कमी गर्दी असल्याचे दिसून येते.

००००

ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अजून संपलेला नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही ठिकाणी रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर कोरोनाविषयक नियमांचे पालन होणे आवश्यक ठरत आहे; परंतु रेल्वे प्रवासात अनेकजण मास्कचा वापर करण्याकडे तसेच सर्वसाधारण डब्यात फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.